सिंधुदुर्ग - जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. असे असताना कुडाळमध्ये मात्र नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे. कुडाळमध्ये बुधवारी आठवडा बाजार भरला होता. यावेळी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. पोलिसांनीही यावेळी घेतलेली बघ्याची भूमिका सर्वांनाच आश्चर्य व्यक्त करायला लावणारी होती.
कुडाळमध्ये बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्यात पोलीस बंदोबस्त देखील कडक केला असताना नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने एकच खळबळ माजली. संचारबंदी असतानाही कुठलेही नियम न पाळता लोकांची उसळलेली गर्दी पाहता प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा...#coronavirus : मुंबईतील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्यात पोलीस बंदोबस्त देखील कडक केला असताना नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने एकच खळबळ माजली. संचारबंदी असतानाही कुठलेही नियम न पाळता लोकांची उसळलेली गर्दी पाहता प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे आता नव्याने सापडलेला कोरोना रुग्ण हा देखील कुडाळ तालुक्यातील आहे. या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनाने बाजारात जी खबरदारी घ्यायला हवी होती ती घेतली गेल्याचे दिसत नाही.