सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधीया, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढवणे आणि पर्यटनाचा विकास करणे या दृष्टिकोनातून हे विमानतळ उभारण्यात आले आहे. 274 हेक्टर जागेवर हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विमानतळाची धावपट्टी 60 मीटर रुंद आणि 2.5 किलोमीटर लांबीची आहे. सध्या या ठिकाणी तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता 15पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी नाईट लॅंडिगचीही व्यवस्था आहे. विमानात इंधन भरण्याचीही सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी नारायण राणे व उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.
'20 वर्षानंतर प्रकल्प पूर्ण' -
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे लोकार्पण सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळ प्रकल्प आणला. राणे राज्यात सत्तेत असताना त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर राणेंचा कुडाळ मालवण मतदारसंघात पराभव झाल्यानंतर राणे सत्तेपासून दूर गेले. त्यानंतर आलेल्या शिवसेनेनेही हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. आज 20 वर्षांनंतर चिपी विमानतळ बांधून पूर्ण होऊन 9 ऑक्टोबरला लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
ठाकरे राणे येणार एकत्र -