सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अखेर 'कोरोना टेस्ट लॅब'साठी मंजुरी मिळाली आहे. 29 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित प्रस्ताव मंजूर केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणार कोरोना टेस्ट लॅब; मुख्यमंत्र्यांची मंजुरी - corona in sindhudurg
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना अखेर 'कोरोना टेस्ट लॅब'साठी मंजुरी मिळाली आहे. 29 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित प्रस्ताव मंजूर केला आहे.
या लॅबचे प्रशिक्षण घेण्यासाठी आज जिल्हा रुग्णालयाचे दोन तज्ज्ञ पुण्याला रवाना झाले. येत्या 20 ते 25 दिवसांत लॅब सुरू होणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेत दिली. या लॅबमुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून कोकणात परतणाऱ्या लोकांची तात्काळ तपासणी करणे या लॅबमुळे सोपे जाणार आहे.
जिल्ह्यात सध्या लाखो चाकरमानी दाखल झाले आहेत. तसेच कोरोनाच्या तपासण्या पुण्यातून करण्यात येतात. या प्रक्रियेला आठ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत. आता या जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या लॅबमुळे तात्काळ तपासण्या करणे सोईचे ठरणार असून यामुळे रोगाचे लवकर निदान होण्यास हातभार लागणार आहे.