महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बागायतदारांना दिलासा... जिल्ह्यात 120 रुपये दराने काजू खरेदीला सुरुवात, जिल्हा बँकेने दिले कॅश क्रेडिट

शेतकरी व कारखानदारांना ‘ना नफा, ना तोटा’ असे धोरण आखून हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा बँक सकारात्मक आहे. मात्र, काजू बी 120 रुपयांच्या खाली कोणीही विक्री करू नये, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.

By

Published : Apr 22, 2020, 10:44 AM IST

sindhudurg
जिल्ह्यात 120 रुपये दराने काजू खरेदीला सुरुवात, जिल्हा बँकेने दिले कॅश क्रेडिट

सिंधुदुर्ग - शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन काजूचे उत्पादन घेतले आहे. त्यात यंदाच्या हवामानामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. त्याचप्रमाणे कारखानदारांनीही बँकेत घर, जमीन किंवा अन्य मौल्यवान वस्तू तारण ठेवून कर्ज घेतले आहे. त्यामुळे शेतकरी व कारखानदारांना ‘ना नफा, ना तोटा’ असे धोरण आखून हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा बँक सकारात्मक आहे. मात्र, काजू बी 120 रुपयांच्या खाली कोणीही विक्री करू नये, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.

जिल्हा बँकेने जाहीर केल्यानुसार काजू बी खरेदीसाठी कॅश क्रेडिट द्यायला सुरुवात केली असून दोडामार्गमध्ये 120 रु किलोदराने काजूबी खरेदीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील काजू बागातदार शेतकऱ्यांनी किलो 120 रुपयाच्या खाली काजू विकू नयेत असे यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले. सध्या कोरोना विषाणूमुळे जर कोणी काजू बी 60 ते 70 रुपये एवढाच दर देऊन खरेदी करत असेल तर तो शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे. त्यामुळे काजू खरेदी करणाऱयांनी 120 रुपये दरावरच खरेदी करावा, अशा सूचनाही सावंत यांनी दिल्या. तसेच जर कोणी 120 रुपयांखाली बी खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असेल तर योग्य तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जाणार आहे, असेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील बंद असलेली मार्केट खुली होत नाहीत, तोपर्यंत काजू दर निश्चित होणार नाही. असे असले तरीही शेतकऱयांनी लॉकडाऊन संपेपर्यंत काजू बीचा स्टॉक करावा. आर्थिक गरज असलेल्या शेतकऱयांनी सोसायटीमार्फत प्रस्ताव करावेत. अशा शेतकऱयांना चार टक्के दराने रक्कम वाढीव देण्यात येईल, असे सावंत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details