सिंधुदुर्ग - आंबोली घाटातील पूर्वीच्या वस परिसरात काळ्या बिबट्या अर्थात ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. सुमारे ७ वर्षांपूर्वी याच आंबोली परिसरात ब्लॅक पँथर दिसला होता. सावंतवाडी शहरातील काही युवक या घाटातून चारचाकीने प्रवास करत होते. यावेळी वस रस्त्याशेजारी उभा असलेला काळा बिबटा त्यांना दिसला. बिबट्याला गाडीची चाहूल लागताच त्याने दरीत उडी मारली.
सिंधुदुर्गात 'ब्लॅक पँथर'चे दर्शन...आंबोली वनपरिक्षेत्रात वावर - amboli forest reserve
आंबोली परिसरात ब्लॅक पँथरचा वावर असल्याबाबत वन अधिकारी सुभाष पुराणिक यांनीही दुजोरा दिला. यापुर्वी वन्यप्राणी गणनेतही आंबोली परिसरात ब्लॅक पँथरचे अस्तित्व दिसून आले आहे.
आंबोली परिसरात ब्लॅक पँथरचा वावर असल्याबाबत वन अधिकारी सुभाष पुराणिक यांनीही दुजोरा दिला. यापूर्वी वन्यप्राणी गणनेतही आंबोली परिसरात ब्लॅक पँथरचे अस्तित्व दिसून आले आहे. आंबोली व पश्चिम घाट परिसरात काही ठिकाणी या काळ्या बिबट्यांचा वावर असल्याचे पुराणिक यांनी सांगितले. या जातीचा बिबट्या प्रामुख्याने घनदाट जंगलात वावरतो. खुल्या परिसरात तो क्वचितच येतो. तसेच काळा रंग वनराईशी मिळता-जुळता असल्याने त्याचे अस्तित्व पटकन जाणवत नाही. यामुळे ब्लॅक पँथर शक्यतो माणसाच्या दृष्टीपथास पडत नसल्याचे पुराणिक यांनी सांगितले. आंबोली घाट परिसर विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, वृक्ष, कीटक, औषधी वनस्पतीसाठी जगप्रसिद्ध आहे. आता या समृद्ध जंगलात ब्लॅक पँथरचे अस्तित्व सिद्ध झाल्याने आंबोलीच्या निसर्ग संपदेत आणखी भर पडलीय.
आंबोली, तिलारी व पश्चिम घाट परिसरात काही ठिकाणी या काळ्या बिबट्यांचा वावर आहे. काळा बिबट्या ही वेगळी जात नसून मार्जार कुळातील बिबट्याचाच हा प्रकार आहे. कातडीच्या रंगामुळे त्याच्या अंगावरचे ठिपके लपतात. त्याच्या कातडीचा रंग त्वचेतील 'मेलॅनीन' या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास कातडी काळी किंवा गडद रंगाची होते. हे मेलॅनीन माणसांच्या त्वचेच्या थरातही असते. त्याचा प्रमाणावरूनच त्वचेचा रंग ठरतो.