महाराष्ट्र

maharashtra

अण्णाभाऊ साठे महामंडळ बरखास्त करणाऱ्या सरकारचा निषेध - राजन तेली

By

Published : Nov 11, 2020, 4:43 PM IST

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचीही थट्टा चालवली आहे. दिवाळीनंतर सरकारविरोधात भाजप मोठे जनआंदोलन छेडणार आहे, असे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग- ठाकरे सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळ बरखास्त करून साधलेल्या राजकारणाचा आम्ही निषेध करत आहोत. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचीही थट्टा चालवली आहे. दिवाळीनंतर सरकारविरोधात भाजप मोठे जनआंदोलन छेडणार आहे, असे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले. कणकवली भारतीय जनता पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली

उमेद अभियान दुर्दैवाने खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम केले जात आहे. जिल्ह्यात ५ हजार महिला मोर्च्यासाठी गोळा झाल्या होत्या. पालकमंत्री उदय सामंत यांच्या महिलांना मुख्यमंत्र्याशी बोललो, १०० कोटींची तरतूद केली, अशा वलग्ना खोट्या ठरल्या. १०० कोटी खात्यात आले नाहीत. सरकार कोणासाठी काम करते? प्रत्येक गोष्टीत सरकार फेल झाले आहे. पगार नाही म्हणून एसटी चालक व वाहकांनी आत्महत्या केली. एसटीचे कर्मचारी ग्रामीण भागातील वाहिनी म्हणून काम करतात. जनतेची सेवा करत असतात, या सारखी शरमेची गोष्ट नाही. भात पीक नुकसान मदतीत शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. गुंठ्याला १०० रुपये मिळणार आहेत, कोकणातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम ठाकरे सरकार करत असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.

अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद

कणकवली भारतीय जनता पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, या सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद केले. या महामंडळाच्या माध्यमातून रोजगार मिळण्यासाठी काम केले जात होते. खऱ्या अर्थाने तळागाळातील समाजाला न्याय देण्याचे काम केले जात होते. काल ठाकरे सरकारने हे महामंडळ रद्द केले, त्याचा निषेध करतो. सरकारने मत्स्य पँकेज जाहीर केले, जिल्ह्यात या पॅकेज विरोधात महिलांनी मोठा मोर्चा मत्स्य कार्यालयावर काढला. त्या पॅकेजमध्ये एकालाच लाभ मिळणार आहे. मच्छिमार बांधवांचे या व्यवसायात संपूर्ण कुटूंब काम करते. सगळीच मंडळी काम करत असताना जाचक अटी सरकारने घातल्या. १५ वर्षांपूर्वीच्या पावत्या मिळणार कश्या? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

शासन व प्रशासन यांच्यात ताळमेळ नाही

जिल्ह्यात वाळू लिलाव नसताना कोल्हापूर व गोवा येथे शेकडो ट्रक जात आहेत. चोरट्या वाळूच्या मागे कोण आहे? अधिकाऱ्याशी हितसबंध कोणाचे आहेत? गोवा दारू पास होतेच कशी? चोरीच्या धंद्यात काही तरुण वाहत चालले आहेत. शासन व प्रशासन यांच्यात ताळमेळ नाही. कोणाचा वरदहस्त आहे. या विरोधात दिवाळीनंतर भाजप ताकदीनिशी रस्त्यावर उतरून अनैतिक धंद्याविरोधात जाब विचारेल, असा इशारा राजन तेली यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details