सिंधुदुर्ग- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विविध मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाकडून छापा टाकण्यात आला. त्यावर प्रताप सरनाईक हा काही साधुसंत नाही, असे मत भाजप खासदार नारायण राणे यांनी सरनाईक यांच्यावर पडलेल्या छाप्याबाबत बोलताना व्यक्त केले. तसेच कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्याशिवाय याबाबत बोलणे उचित ठरणार नाही असेही ते म्हणाले.
शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) पथक दाखल झाले आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचे पथक दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. प्रताप सरनाईक यांचे पूत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले असल्याचे कळत आहे. 'ईडी'ने एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहीम सुरू आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेस आहे.