महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राजा होण्यासाठी मन मोठं लागतं', आमदार नितेश राणे यांची ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका - Nitesh Rane on eknath shinde

दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले नसल्याने भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून टीका केली आहे.

BJP MLA Nitesh Rane has criticized Uddhav Thackeray for devendra fadnavis not invited to balasaheb thackeray memorial bhoomi pujan program
'राजा होण्यासाठी मन मोठं लागतं', आमदार नितेश राणे यांची ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका

By

Published : Apr 1, 2021, 1:22 AM IST

सिंधुदुर्ग - दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले नसल्याने भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेत्यांची 'मन खूप लहान झाली आहेत' असे म्हटले आहे.

आज बाळासाहेब असते तर....
भाजप आमदार नितेश राणेंनी म्हटलं आहे की, 'आज बाळासाहेब असते तर असे होऊ दिले नसते. एक सच्चा, मूळ शिवसैनिक एकनाथ शिंदे ज्यांच्या खात्याचा हा कार्यक्रम आहे. त्यांनाच बोलवण्यात आले नाही. याने शिवसेनेत सुरु असेलेली गटबाजी सिद्ध होते. आज शिवसेनेमध्ये कडवट शिवसैनिकांची किंमत नाही.'

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये काय म्हटले आहे?
आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, त्यांच्यानंतर … फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत! अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

नितेश राणे यांचे ट्विट

हेही वाचा -'आधी गरीबांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करा मग लॉकडाऊन लागू करा'

हेही वाचा -...तर शरद पवार हे बाळासाहेब यांच्या स्मारकाच्या जागेवर राष्ट्रवादीचे कार्यालय उभारतील - निलेश राणे

ABOUT THE AUTHOR

...view details