महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमित शाहांच्या दौऱ्यामुळे राज्यात सत्तांतराचे शुभ संकेत- प्रमोद जठार

महाराष्ट्र राज्यातही त्यांच्या दौऱ्यामुळे सत्तांतराचे शुभ संकेत मिळत आहेत. राज्यातील तीन पक्षाचे सरकार केवळ विकासकांमाना बुच मारण्याचे काम करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला.

राज्यात सत्तांतराचे शुभ संकेत- प्रमोद जठार
राज्यात सत्तांतराचे शुभ संकेत- प्रमोद जठार

By

Published : Feb 7, 2021, 3:11 AM IST

Updated : Feb 7, 2021, 3:50 AM IST

सिंधुदुर्ग - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज सिंधुदुर्गात येत आहेत. राज्याच्या वतीने आम्ही त्यांचे स्वागत करतो. अमित शाह ज्या प्रदेशात जातात, तो प्रदेश शत प्रतिशत भाजपमय होतो. ते पश्चिम बंगालच्या कामाला लागले आहेत, या ठिकाणी भविष्यात भाजपचा मुख्यमंत्री बसवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातही त्यांच्या दौऱ्यामुळे सत्तांतराचे शुभ संकेत मिळत आहेत. राज्यातील तीन पक्षाचे सरकार केवळ विकासकांमाना बुच मारण्याचे काम करत आहेत, असा आरोप भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला. शाह हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत.

पालघर ते सिंधुदुर्ग भाजपा शत प्रतिशत होईल-

राज्यात सत्तांतराचे शुभ संकेत- प्रमोद जठार
पालघर ते सिंधुदुर्ग भाजपा शत प्रतिशत होईल. तर राज्यात सत्ता परिवर्तन होईल. मंत्रालयातील सर्व अधिकारी कंटाळलेले आहेत. अधिकाऱ्यांची इच्छा काम करण्याची राहिली नाही. एकाच कामात तीन-तीन पक्षाचे मंत्री निर्देश देत आहेत. विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी कुरघोडी केली जात आहे. अधिकाऱ्यांसारखी जनता कंटाळली आहे. १०० युनिट वीज बिल माफी देऊ अशी घोषणा ऊर्जामंत्री यांनी केली. मात्र आता मीटर तोडणी करत आहेत. ऊर्जामंत्री वीजबिल माफी करु असे सांगतात, पण मुख्यमंत्री सांगताहेत हे जमणार नाही. काँग्रेसच्या मंत्र्यांना तिसऱ्या फळीची वागणूक दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांना समजायला लागले आहे, राष्ट्रवादी व काँग्रेस आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते कुठल्याही कामाच्या फाईलवर सह्या करत नाहीत, असा टोला प्रमोद जठार यांनी लगावला आहे.शिवसेना आता कोण्या नव्या रिबेका मार्क भेटण्याची वाट पाहत आहे का?आडाळी एमआयडीसी संदर्भात अजूनही मुख्यमंत्री ठाकरे याच्याकडून कोणतेही निर्देश नाहीत. आयुर्वेदिक विज्ञान केंद्राला आडाळीत जागाच मिळाली नाही, याबाबत खासदार खोटं बोलतात. या प्रकल्पाचेही काँगेसचे मंत्री अमित देशमुख यांनी बुच मारुन ठेवले आहे. तर राष्ट्रवादी व काँगेसला नाणार हवा आहे. पण नाणार प्रकल्पात शिवसेनेने आडकाठी आणली आहे. शिवसेना आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव व खासदार तटकरे नानारला पाठींबा दर्शवत आहेत. मग खासदार राऊतांचे अडले कुठे? शिवसेना आता कोण्या नव्या रिबेका मार्क भेटण्याची वाट पाहत आहे का? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या वीज बिल माफीला मुख्यमंत्री यांनी खोडा घातला,असा आरोप प्रमोद जठार यांनी केला.

ठाकरेंच्या कार्यपद्धतीला आमदार कंटाळले-

जनता,नोकरशाह ठाकरे सरकारला कंटाळली आहे. गोव्यात राज्याचा शेष कमी करत पेट्रोल दर कमी आणले. ठाकरे यांना २० रुपये पेट्रोल शेष कमी करायचा आहे. मात्र अजित पवार यांचा विरोध आहे. ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला आमदार कंटाळले आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहा येत असल्याने राज्यात परिवर्तन होईल. शेतकरी आंदोलनात भूमिका घेण्याबाबत तिन्ही पक्ष खोटारडे आहेत. सर्वच नेत्यांना लाज वाटत आहे. केंद्र सरकारने लागू केलेले कायदे राज्यात यापूर्वीच लागू केला आहे. असेही ते म्हणाले. चिपी विमानतळासाठी रस्ते,पाणी,वीज नाही त्यामुळे हे विमानतळ सुरू होऊ शकत नाही असेही ते म्हणाले.


Last Updated : Feb 7, 2021, 3:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details