सिंधुदुर्ग - भाजपा नेते प्रमोद जठार यांच्यावर खासदार विनायक राऊत यांनी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना, 'मला दलाल म्हणणाऱ्या राऊत यांना मी शोधत आहे', असे जठार म्हणाले. त्यांनी कणकवलीच्या पटवर्धन चौकात माझी माफी मागावी, अशी मागणीही जठार यांनी केली आहे. दोन वेळा आम्ही या खोट्या नाण्याला निवडून दिले. २०२४ ला या नाण्याच्या कपाळात आम्ही धोंडा घातल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले नाणार प्रकल्पाला खासदार विनायक राऊत यांचा प्रखर विरोध आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.
'या' खोट्या नाण्याच्या कपाळात धोंडा घातल्याशिवाय राहणार नाही, नाणारवरून स्थानिक राजकारण तापले आमचं नाणं खोटंं
नाणार प्रकल्पामुळे कोकणातील दीड लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. चार लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे स्थानिक बेरोजगारी हटणार आहे. या देशातील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक भाग हा प्रकल्प खेचून नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र आमचंच नाणं खोट निघालेलं आहे. आमचे खासदार हा प्रकल्प पळवून लावण्याच्या तयारीत आहेत. काय सांगणार बाबांनो या खोट्या माणसाला आम्हीच निवडून दिल. हे पाप आमचं आहे! २०२४ ला आम्ही ते धूऊन काढू, असा टोला जठार यांनी लगावला आहे. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजूनही सांगणं आहे या खासदाराचे काही ऐकू नका. तुम्ही अधिसूचना काढा. जनतेचा जो काही कौल आहे, तो समजून घ्या. जो काही भाव आहे तो जाहीर करा, आणि मग जनतेला हवे असल्यास प्रकल्प होईल, असे त्यांनी सुचवले.
'मातोश्री'च्या नातेवाईकांनी घेतलेल्या जमिनीचे दलाल कोण
विनायक राऊत यांनी कणकवलीच्या पटवर्धन चौकात माझी जाहीर माफी मागावी. अन्यथा 'मातोश्री'च्या नातेवाईकांनी घेतलेल्या जमिनीचे दलाल कोण आहेत? ते जाहीर करावेत. अन्यथा आम्ही खासदार विनायक राऊत हेच दलाल आहेत असे म्हणू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाची अधिसूचना काढावी, आणि लोकांना एक संधी द्यावी. नाहीतर विदर्भ काय? कर्नाटक काय? हे सगळेच हा प्रकल्प पळवण्यासाठी टपलेले आहेत, असे जठार म्हणाले.