महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुमच्यामुळे 'ते' अख्खं कुटूंब देशोधडीला लागलं.. आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा - नितेश राणे

वरळीच्या बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटाच्या (worli cylinder blast) दुर्घटनेनंतर भाजपने पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या दुर्घटनेसाठी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली. (Nitesh Rane on BDD Chawl cylinder blast) नितेश राणे यांनी मंगळवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले.

worli cylinder blast
worli cylinder blast

By

Published : Dec 7, 2021, 3:04 PM IST

Updated : Dec 7, 2021, 3:16 PM IST

सिंधुदुर्ग -वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटात (worli cylinder blast)आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे, तर या कुटुंबातील एका मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. यावरूनच आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करुन साधला निशाणा -

वरळीच्या बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटाच्या (worli cylinder blast) दुर्घटनेनंतर भाजपने पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या दुर्घटनेसाठी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणेयांनी केली. (Nitesh Rane on BDD Chawl cylinder blast) नितेश राणे यांनी मंगळवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले.

भाजप आमदार नितेश राणे
संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागले -
वरळी दुर्घटनेत जखमी झालेली लहान मुलगी, तिचे वडील आणि आता तिच्या आईचाही मृत्यू झाला आहे. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या निर्लज्ज कारभारामुळे हे संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागले. आता थोडीतरी शरम शिल्लक असेल तर वरळीचे स्थानिक आमदार आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे नितेश राणे यांनी म्हटले. नितेश राणे यांच्या या टीकेला आता शिवसेनेकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महापालिका आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका कुटुंबाचा बळी गेला आहे. आता मुंबईचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जरा लाज उरली असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असं नितेश राणे म्हणाले.

नेमकी काय घटना घडली होती -
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बीडीडी चाळीतील एका घरात सिलिंडर स्फोट (worli cylinder blast) झाला होता. त्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले होते जखमींना सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नायर रुग्णालयात त्यांना तत्काळ उपचार मिळाले नसल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात पालिकेने एक डॉक्टर, एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि एका परिचारिकेला निलंबित केले. या प्रकरणात पालिकेने चौकशी समितीही नियुक्त केली आहे. या कुटुंबातील पाच वर्षांचा मुलगा वाचला असून त्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार महिन्यांच्या बालकाचा एक डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर ४ डिसेंबरला २७ वर्षीय आनंद पुरी यांचा मृत्यू झाला होता, तर आज २५ वर्षीय विद्या पुरी यांचा मृत्यू झाला. त्या या स्फोटात ५० ते ६० टक्के भाजल्या होत्या.
Last Updated : Dec 7, 2021, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details