महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील घोळाप्रकरणी भाजपा न्यायालयात जाणार' - sindhudurg bjp news

पदवीधर मतदारसंघात मतदानात घपला झाला असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

chandrakant
chandrakant

By

Published : Jan 7, 2021, 5:58 PM IST

Updated : Jan 7, 2021, 7:46 PM IST

सिंधुदुर्ग - ९०० पैकी ३०० केंद्रांवर एका तासामद्ये १३८ असे मतदान झाले आहे, असे सांगत पदवीधर मतदारसंघात मतदानात घपला झाला असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याबाबत लवकरच विथ प्रॅक्टिकल पत्रकार परिषद घेऊ आणि सगळ्याचा पोलखोल करू, असेही ते म्हणाले. लवकरच आम्ही जनहित याचिका दाखल करणार आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात पाच हजार मतपत्रिका कोऱ्या निघाल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

chandrakant

ट्रॅक्टर रॅली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला समर्थन देण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे नेतृत्व चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

'२०२४च्या निवडणुकीला काँग्रेस घाबरली'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनता केंद्रस्थानी ठेवत अनेक हितकारी निर्णय घेतले. त्या माध्यमातून भाजपा व मोदींना मिळत असलेला पाठिंबा हा काँग्रेसची डोकेदुखी ठरत आहे. हे काम जर असेच सुरू राहिले तर ​२०२४मधील निवडणुकांमध्ये भाजपाचे ४००पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. काँग्रेसचे सध्याचे असलेले खासदार एका बसमधून जातील एवढेच आहेत, असे ते म्हणाले.

'नामांतरावरून सरकार पडेल, असे वाटत नाही'

शिवसेनेने गेल्या १३ महिन्यात खुर्चीसाठी अस्मीतेचे आगळे विषय सोडले. सावरकर सोडले, अयोध्या सोडली, हिंदुत्व सोडून दिल त्यामुळे खुर्चीसाठी औरंगाबादचे संभाजीनगर नको औरंगाबाद रहायला हरकत नाही तेही म्हणायला त्यांना हरकत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी शिवसेनेवर केली. यातून भांडण विकोपाला जातील आणि सरकार पडेल, असे मला वाटत नाही. कारण काँग्रेसलाही पर्याय नाही आणि सेनेलाही पर्याय नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी कृषी विधेयकावरूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

Last Updated : Jan 7, 2021, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details