महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवार यांचा आत्मचरित्रात एक आणि अंमलबजावणीत दुसरा चेहरा; भाजपाचा आरोप - सिंधुदुर्ग न्यूज

भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, शरद पवार यांचा आत्मचरित्रात एक आणि अंमलबजावणीत दुसरा चेहरा असल्याचं म्हटलं आहे.

bjp ex mla pramod jathar criticized ncp leader sharad pawar
शरद पवार यांचा आत्मचरित्रात एक आणि अंलबजावणीत दुसरा चेहरा, भाजपाचा आरोप

By

Published : Oct 17, 2020, 5:06 PM IST

सिंधुदुर्ग - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आपल्या "लोक माझे सांगाती" या आत्मचरित्राच्या २३८ व्या पानावर कृषी उतपन्न बाजारसमित्या खारीज केल्या पाहिजेत, असे म्हणतात. मात्र तेच धोरण ठेऊन मोदी सरकारने पारित केलेले कृषी विधेयक राज्यात लागू करत नाहीत. यातून आत्मचरित्रात एक चेहरा आणि सरकार चालवताना अंमलबजावणीमध्ये त्यांचा दुसरा चेहरा दिसून येत आहे. असा आरोप भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रमोद जठार यांनी देवगड येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 'केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱयांच्या शेती मालाचा भाव दुप्पट करेल आणि ग्रहकाला सुद्धा स्वस्त दरामध्ये वस्तू त्याठिकाणी मिळेल अशाप्रकारे दोन्ही बाजूचा विचार करून मोदींनी हा कायदा आणला आहे. मात्र या विधेयकाला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली आणि त्याची अंमलबजावणी करू नका म्हणून ठाकरे सरकारने सांगितलं.'

प्रमोद जठार बोलताना...

या सरकारचे गॉडफादर शरद पवार देशाचे दोन वेळा कृषी मंत्री झाले. त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिलं आहे. "लोक माझे सांगाती" या त्यांच्या आत्मचरित्राची प्रस्थावनाही सुप्रिया सुळे यांनी लिहिली आहे. या आत्मचरित्राच्या २३८ व्या पानावरती शरद पवार लिहितात शेतीमाल कृषी उतपन्न बाजार समितीत जाण्याची गरज नाही. या बाजार समित्या खारीज करण्यात याव्यात. शेतकऱ्याला त्याचा माल देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही विकता यावा. इतर माल जगाच्या कानाकोपऱ्यात विकायला मुभा असेल तर शेतमाल केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीतच विकण्याची सक्ती का? अशाप्रकारचा विचार त्यांनी आपल्या आत्मचरित्रात मांडला आहे आणि तोच विचार मोदींनी प्रत्यक्षात आणला, त्याच्यावर कायदा केला. मात्र त्या कायद्याला मात्र ठाकरे सरकारने राज्यात स्थगिती आणली आहे. म्हणजे आत्मचरित्रामध्ये एक चेहरा आणि प्रत्यक्षात अंलबजावणीत दुसराच चेहरा असे पवार यांचे धोरण असल्याचे प्रमोद जठार यावेळी म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरीविरोधी असून पोटात एक आणि ओठात एक अशी शरद पवार यांची भूमिका असल्याचे दिसत असून हे आपण जनतेसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details