महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढीव वीज बिलाविरोधात भाजप आक्रमक; सिंधुदुर्गात आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Energy Minister Nitin Raut

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळातील वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मुद्यावरुन यूटर्न घेतला आहे. यानंतर ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. या मुद्यावरुन भाजपाने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. तसेच सिंधुदुर्ग भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.

भाजप आक्रमक
भाजप आक्रमक

By

Published : Nov 20, 2020, 8:33 AM IST

सिंधुदुर्ग -राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळातील वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मुद्यावरुन यु टर्न घेतला आहे. यानंतर ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावरून जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. कोरोना काळात वाढीव वीज बिलामुळे जनतेची आर्थिक लुटमार होत आहे. त्यामुळे नागरिकांना वीज बिलात सवलत मिळालीच पाहिजे. वीज बिल भरण्यासाठी सक्तीचे राबवलेले धोरण आम्ही जिल्ह्यात चालू देणार नाही. असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे. तसेच यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. परिस्थिती जास्त चिघळू नये, म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले.

राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष

ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाने मनमानी कारभार

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यावेळी म्हणाले, कोरोना काळात वाढीव वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जा मंत्र्यांनी केली होती. मात्र आता तेच ऊर्जामंत्री वीज बिल माफ होणार नाही,असे सांगून जनतेची फसवणूक करत आहेत. त्यामळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. तसेच महावितरण प्रशासन हे ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाने मनमानी कारभार करत आहेत. हे सक्तीचे राबविलेले धोरण जास्त काळ टिकू देणार नाही, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरण कार्यालयावर मोर्चा

वाढीव वीजबिलामध्ये सूट देण्याच्या आश्वासनावरुन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घूमजाव केल्यानंतर राज्यात नागरिकांमध्ये नाराजी आहे. भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका होत. आहे. दरम्यान, कुडाळ येथील भाजप कार्यकर्त्यांनीही सरकारच्या वीज बिलाविषयीच्या धोरणाविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता.

मोर्चादरम्यान सरकावरविरोधात घोषणाबाजी-

मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकावरविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, कोरोनाकाळात आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत मिळावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर परिस्थिती चिघळू नये, म्हणून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनाचे नेतृत्व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.

यावेळी, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिक आधीच आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. त्यात वाढीव वीज बिलामुळे जनतेची आर्थिक लूटमार होत आहे. त्यामुळे नागरिकांना वीज बिलात सवलत मिळालीच पाहिजे. वीज बिल न दिल्यामुळे जिल्ह्यातील कोणाचीही वीज कापण्यात येऊ नये. अशी मागणी भाजपने केली. तसेच, महावितरण प्रशासन ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाने मनमानी करत आहे. विज बिले भरण्यासाठी सक्तीचे राबवलेले धोरण या जिल्ह्यात चालू देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला आहे.

हेही वाचा-वीज बिल प्रकरण : लाथो के भूत बातों से नही मानते…; मनसे नेत्याचा सरकारला इशारा

हेही वाचा-कृषीपंप वीज जोडणीसाठी राज्यात नवीन धोरण, मागील पाच वर्षांतील थकबाकीसाठी 50 टक्के सवलत

ABOUT THE AUTHOR

...view details