सिंधुदुर्ग - जिल्ह्यात राजकीय राडे अनेक वेळा पहायला मिळालेत. सेना आणि राणे यांच्यातील रंगलेला राजकीय कलगीतूरा नेहमी या जिल्ह्यात अनेकवेळा पहायला मिळाला. सध्यातरी राणे आणि शिवसेना यांच्यातून विस्तव जात नाही, अशीच स्थिती आहे. भाजपाने तर शिवसेनेला रोखण्यासाठी केंद्रात राणेंना मंत्रिपद दिले आहे, अशी चर्चा आहे. परंतु अशा गंभीर वातावरणातही वेंगुर्ले येथे या दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते. वेगुर्ले नगरपरिषदेच्या वेगुर्ले सागररत्न मत्स्य बाजारपेठ लोकार्पणाच्या निमित्ताने आज काही वेगळं घडलं. याची एकच चर्चा सध्या कोकणात सुरू आहे.
सिंधुदुर्गात वेगळ्या राजकारणाची नांदी.. शिवसेना नेते, नितेश राणे अन् भाजपातील राणे समर्थक एकाच व्यासपीठावर - शिवसेना नेते व राणे समर्थक एकाच व्यासपीठावर
वेगुर्ले नगरपरिषदेच्या वेगुर्ले सागररत्न मत्स्य बाजारपेठ लोकार्पणाच्या निमित्ताने आज राजकीय वर्तुळातील वेगळा अनुभव पहायला मिळाला. या निमित्ताने शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते.
आम्ही विकासासाठी एकत्र आलो -
वेगुर्ले नगरपरिषदेच्या वेगुर्ले सागररत्न मत्स्य बाजारपेठ लोकार्पणाच्या निमित्ताने आज राजकीय वर्तुळातील वेगळा अनुभव पहायला मिळाला. या निमित्ताने शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते. राणे आणि सेना यांच्यातील राजकीय वैर नेहमी पहायला मिळते मात्र या वेळी चित्र उलट होते. नितेश राणे आणि विनायक राऊत हे कानात हितगुज करताना पाहायला मिळाले. नितेश राणेंनी तर जाहीर भाषणातून सेना आणि भाजपच्या युतीवर भाष्य केले. हल्ली युतीची चर्चा बंद होती पण हे चित्र पाहिल्यानंतर युतीची चर्चा करणाऱ्यांना चांगली झोप लागेल. या चित्रामुळे युतीची चर्चा नक्की रंगेल. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू, असं वेगळे राजकीय संकेत भाजप आमदार नितेश राणेंनी दिलेत. याबाबत माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी विकासासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. यात काही राजकारण नाही तुम्हाला काय ब्रेकिंग चालवायच्या आहेत त्या चालवा, असे ते म्हणाले.