महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाॅकडाऊनमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ हजार ट्रक तोडलेला बांबू जाग्यावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रामाणावर बांबूचे उत्पन्न घेतले जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे येथील बांबू उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक यांची सध्या मोठी पंचाईत झाली आहे. लाॅकडाऊनपुर्वी तोडलेला सुमारे २ हजार ट्रक बांबू सध्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पडून आहे.

sindhudurg
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ हजार ट्रक तोडलेला बांबू जाग्यावर

By

Published : Apr 23, 2020, 4:57 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात बांबू उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक यांची सध्या मोठी पंचाईत झाली आहे. लाॅकडाऊनपुर्वी तोडलेला सुमारे २ हजार ट्रक बांबू सध्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पडून आहे. गोवा, कर्नाटक, केरळ आदी राज्यात येथील बांबू जात असून, येथील 'माणगा' जातीच्या बांबूला मोठी मागणी आहे. तोडलेला बांबू वाहतूक करून बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी करत आहेत.

जनार्दन सामंत, बांबू व्यावसाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात बांबूची लागवड आहे. काही भागात नैसर्गिकरीत्या वनांमध्ये बांबू रुजून येतो. ते क्षेत्र वेगळेच आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या बांधावरही पारंपरिक बांबू लागवड आहे. या सर्व शेत्रातून केवळ माणगा जातीच्या बांबूचे दरवर्षी २ हजार ट्रक उत्पन्न येथील शेतकऱ्याला मिळते. जिल्ह्यात बांबूचे उत्पादन घेणारे १० हजार शेतकरी आहेत. कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय यामधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

लाॅकडाऊनमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ हजार ट्रक तोडलेला बांबू जाग्यावर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणारी माणगा ही केवळ खासगी क्षेत्रातच मुबलक उपलब्ध होणारी महाराष्ट्रातील किंबहुना, देशातील ही एकमेव अशी बांबूची जात आहे. माणगा जातीसोबत चीवार ही दुसरी एक जात जिल्ह्यात सापडते. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची खरे तर ही छुपी अर्थव्यवस्था आहे. येथील शेतकरी त्याला २४ तास कधीही परतावा देण्याची खात्री असणारे फिक्स डिपॉझीट मानतो. एमआरजीएस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांणा शासनाने अनुदान देत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहीत केले आहे. दरम्यान, जाग्यावर पडून असलेला बांबू योग्य वेळी बाजारपेठेत गेला नाही, तर दीड महिन्यावर आलेला पावसाळा बांबू व्यावसाईक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करू शकतो.
लाॅकडाऊनमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ हजार ट्रक तोडलेला बांबू जाग्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details