महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nilesh Rane Vs Uddhav Thackeray : त्यांच्या या कृतीवर तर जुने शिवसैनिकही नाराज - निलेश राणे - Union Minister Narayan Rane

बाळासाहेब ठाकरे यांची जीवाची पर्वा न करता संरक्षण करण्याचे काम केलेल्या नारायण राणे यांचे राहते (Narayan Rane's house) घर तोडण्यासाठी (trying to destroy) त्यांचाच मुख्यमंत्री मुलगा उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) प्रयत्न करत ( trying to destroy) आहे. त्यांची ही कृती तर जुन्या शिवसैनिकांनाही आवडलेली नाही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आदीश बंगल्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि माजी खासदार निलेश राणे उपस्थित आहेत. असे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.

MLA Nitesh Rane
आमदार नितेश राणे

By

Published : Feb 21, 2022, 1:51 PM IST

Updated : Mar 15, 2022, 4:47 PM IST

सिंधुदुर्ग: आमदार नितेश राणे यांनी आज ओरोस पोलिस ठाण्यात हजेरी लावली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची नारायण राणे यांनी जीवाच्या पलीकडे सेवा केली. मात्र त्याची कोणतीही जाणीव न ठेवता बाळासाहेबांचे चिरंजीव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राणे यांचे घर तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आमदार नितेश राणे

'नीलरत्न' बाबत कोणतीही नोटीस नाही
आदिश बंगल्याच्या बाहेर मुंबई महानगरपालिकेत पथक पोचले आहे. मात्र नीलरत्न बंगल्याबाबत अद्यापही आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. आदिश बंगल्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे हे उपस्थित आहेत. ते या पथकाला योग्य ती माहिती देतील असे ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना जनतेचे प्रश्न सोडवायला वेळ नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही कृती जुन्या शिवसैनिकांना आवडलेली नाही. त्यांचे आम्हाला फोन येत आहेत आणि आपली नाराजी ते व्यक्त करत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ आहे, मात्र महाराष्ट्रातील जनतेला भेटायला वेळ नाही. जनतेचे प्रश्‍न सोडवायला वेळ नाही. अशी टीका देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भेटीवर केली आहे.

आदित्य ठाकरेंवरही निशाना
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी निशाना साधला. आदित्य ठाकरे हे याठिकाणी फोटोसेशन करायला येत आहेत? की बंगला किती पडला हे पाहायला येत आहेत? असा उलट प्रश्नच त्यांनी उपस्थित केला. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री म्हणून या जिल्ह्याच्या स्वतंत्र दौऱ्यावर ते अडीच वर्षानंतर आले आहेत. मागे जाताना किमान काहीतरी पॅकेजची घोषणा करून त्यांनी जावे असे देखील नितेश आणि यावेळी म्हणले आहे.

Last Updated : Mar 15, 2022, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details