सिंधुदुर्ग- प्राचीन काळापासून कलेचा वापर संदेश देण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी केला जातो. अशात आता चित्रकलेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करावे. कोणी घराबाहेर पडू नये, असा संदेश देणारी चित्रे कुडाळ येथील चित्रकार व पत्रकार रजनीकांत कदम यांनी त्यांच्या कुंचल्यातून रेखाटली आहेत.
कोरोनाविषयी चित्रांमधून जनजागृती, कलाकार रजनीकांत कदम यांचा उपक्रम - awareness about corona from paintings
केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करावे. कोणी घराबाहेर पडू नये, असा संदेश देणारी चित्रे कुडाळ येथील चित्रकार व पत्रकार रजनीकांत कदम यांनी त्यांच्या कुंचल्यातून रेखाटली आहेत. या चित्रांमधून त्यांनी दिवसरात्र सेवा देणारे डॉक्टर, पोलीस, तसेच प्रशासन या सर्वांच्या प्रती आदर व्यक्त केला आहे.
![कोरोनाविषयी चित्रांमधून जनजागृती, कलाकार रजनीकांत कदम यांचा उपक्रम कोरोनाविषयी चित्रांमधून जनजागृती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7054594-127-7054594-1588583195638.jpg)
या चित्रांमधून त्यांनी दिवसरात्र सेवा देणारे डॉक्टर, पोलीस, तसेच प्रशासन या सर्वांच्या प्रती आदर व्यक्त केला आहे. चित्रकलेच्या माध्यमातून रजनीकांत कदम यांनी केलेल्या जनजागृतीचे व त्यांच्या कलेचे कौतूक होत आहे. सध्या जगासमोर असलेले कोरोनाचे संकट भारतासमोरही ठाण मांडून बसले आहे. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेची जनजागृती व्हावी म्हणून कविता, शॉर्टफिल्म, विविध जाहिराती तसेच बातम्या यांचा वापर केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रकलेच्या माध्यमातून जनतेची जनजागृती व्हावी याकरता रजनीकांत कदम यांनी पुढाकार घेतला आहे.
कदम यांनी चित्रांमधून देशाचा नकाशा दाखवला असून त्यात एक घर व सुरक्षित कुटुंब दाखवले आहे. तसेच देश हातात असल्याचे दाखवून आपल्या देशाचे भवितव्य आपल्या हातात आहे असा मुख्य संदेश दिला आहे. याशिवाय मास्क वापरा, गर्दी करू नका, सॅनिटायझरने हात धुवा, आजारी असल्यास वैद्यकीय तपासणी करा, असेही संदेश त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी दिले आहेत.