सिंधुदुर्ग - कोरोनामुळे मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांना गावातच रोजगार देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहिर केलेल्या 'आत्मनिर्भर भारत अभियान' माध्यमातून चाकरमान्यांना गावातच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक तथा अत्मनिर्भर भारत अभियान समितीचे प्रमुख अतुल काळसेकर यांनी दिली.
आत्मनिर्भर भारत अभियान : 'चाकरमान्यांना गावातच मिळणार रोजगार'
'आत्मनिर्भर भारत अभियान' माध्यमातून चाकरमान्यांना गावातच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक तथा अत्मनिर्भर भारत अभियान समितीचे प्रमुख अतुल काळसेकर यांनी दिली.
काळसेकर पुढे म्हणाले, जिह्यात 70 हजार चाकरमानी आले आहेत. त्यांच्यापर्यंत हे पॅकेज पोहचविण्यात येणार आहे. यासाठी जिह्यात आत्मनिर्भर समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे माणगाव खोऱ्यात पोल्ट्री व्यवसाय करण्यात येतो, तेथे जर स्लॉटर हाऊस करता आले तर त्याचा फायदा होऊ शकतो. जिह्यात अंड्याना मागणी असताना त्या अनुषंगानेही प्रयत्न करण्यात येणार आहेत.
चाकरमानी गावात आल्याने आता गावांमधील पडीक असलेली जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शेती व अन्य उद्योगांच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. लॉकडाऊनमुळे जे कारागीर आपल्या गावी गेलेत त्यांची जागा आपल्या जिह्यातील लोक घेवू शकतात का? याचाही या अभियानात समावेश करण्यात येणार असल्याची माहिती काळसेकर यांनी दिली.