महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात नारायण राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, पोलिसांमध्ये व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धरपकड - Attempt to burn Narayan Rane statue in Sindhudurg

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कणकवलीत शिवसेना कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा हिसकावून घेतला. यात पोलिस व शिवसैनिकांमध्ये जोरदार झटपट झाली. अखेर पोलिसांनी नारायण राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा हिसकावून घेतला. त्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सिंधुदुर्गात नारायण राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, पोलिसांमध्ये व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धरपकड
सिंधुदुर्गात नारायण राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, पोलिसांमध्ये व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धरपकड

By

Published : Aug 24, 2021, 3:48 PM IST

सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कणकवलीत शिवसेना कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा हिसकावून घेतला. यात पोलिस व शिवसैनिकांमध्ये जोरदार झटपट झाली. अखेर पोलिसांनी नारायण राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा हिसकावून घेतला. त्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सिंधुदुर्गात नारायण राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, पोलिसांमध्ये व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धरपकड

पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौकांमध्ये नारायण राणे यांच्या प्रतिकृती पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या प्रमाणात जमलेल्या पोलीस पथकाने हा प्रयत्न हाणून पाडला. राणे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवली शहरांमध्ये याची ठिणगी पडण्याची शक्‍यता होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी दंगल काबू पथकास दोन पोलिस पथके आज सकाळपासून तैनात ठेवली होती. जसे, वातावरण माध्यमातून तापत होते तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते कणकवलीच्या विभागीय शिवसेना शाखेमध्ये जमा होत होते. आज सकाळी अकरा वाजेपर्यंत जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पुढची रणनीती सुरू झाली होती.

सिंधुदुर्गात शिवसैनिक रस्त्यावर

दुपारच्या सुमारास नरडवे नाक्यावर जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नगरसेवक सुशांत नाईक नगरसेवक कन्हैया पारकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवा सेना प्रमुख हर्षद गावडे, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा विखाळे, अजय सावंत, रिमेश चव्हाण, सुजित जाधव आधी शिवसेना कार्यकर्त्यांचा समावेश होता. मुख्य चौकांमध्ये पुतळा जाळण्यासाठी अचानकपणे जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमुळे पोलिसांची धांदल उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details