महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 23, 2020, 7:23 AM IST

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग व रत्नागिरी प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित करावी- अमित देशमुख

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार अरविंद सावंत, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

medical hospital in sindhudurg
सिंधुदुर्ग व रत्नागिरी प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित करावी - अमित देशमुख

सिंधुदुर्ग -दोन जिल्ह्यांतील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा निश्चित करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख दिले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार अरविंद सावंत, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान 20 एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करावी, असे देशमुख यांनी सांगितले. यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता) तयार करण्यात यावा, असे ते म्हणाले.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यापैकी रायगड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबतचे काम सुरू असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाने किमान 20 एकर जागा निश्चित करून वैद्यकीय शिक्षण विभागास लवकरात लवकर कळवावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

कोकणात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी, असे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

आधी आहे ते नीट करा..मग नवं रुग्णालय बांधा

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीस भाजपाचे राज्यसभेवरील खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारच्या निर्णयास विरोध दर्शवला होता. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या निर्णयावर निशाणा साधला. आधीच जिल्हा रुग्णालयात परिचारिका, डॉक्टर्स, ऑक्सिजन सिलेंडर्सची कमी आहे. त्यातच आता हा नवा प्रकल्प हाती घेतलाय. आधी जिल्हा रुग्णालयात नीट सेवा पुरवा, आणि मग नवं रुग्णालय बांधा, असा सल्ला खासदार नारायण राणे यांनी दिला होता. या पत्रकार परिषदेला आमदार नितेश राणे आणि नगरपरिषदेचे अध्यक्ष उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details