महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबोली सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण शाळेने केले बंद; पालकांचे आंदोलन - अंबोली सैनिक स्कूल बातमी

अंबोली सैनिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण शाळेने बंद केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेसमोर उपोषण केले.

parents protest
पालकांचे आंदोलन

By

Published : Feb 25, 2021, 9:21 PM IST

Updated : Feb 25, 2021, 10:24 PM IST

सिंधुदुर्ग -जिल्ह्यातील अंबोली सैनिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण शाळेने बंद केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेसमोर उपोषण केले. आमच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू करा आणि कोरोनाकाळात शाळा बंद असल्यामुळे वार्षिक फीमध्ये सवलत द्या, अशी मागणी या पालकांची आहे. मात्र, शाळा प्रशासन पालकांच्या या मागणीला दाद देत नसल्यामुळे पालकांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दाद मागायचे ठरवले आहे.

अंबोली सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण शाळेने केले बंद

शाळा प्रशासन आमचं काही ऐकूनच घेत नाही

मंदार रामचंद्र शहासने हे पेनहून या ठिकाणी आलेत. कोरोनामुळे मी माझ्या मुलाला शाळेत पाठवू शकत नाही त्यामुळे शाळेने माझ्या मुलाचे थांबविले ऑनलाईन शिक्षण सुरू करावे. तसेच आठ महिने शाळा बंद असल्यामुळे फी मध्ये आपल्याला सवलत द्यावी अशी त्यांची मागणी आहे मात्र शाळा प्रशासन आमचं काही ऐकूनच घेत नाही. अशी तक्रार देखील त्यांनी यावेळी बोलताना केली

विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून या ना त्या कारणाने फी उकळायची आहे

संजय सावंत सांगतात इयत्ता सहावी पासून माझा मुलगा या शाळेमध्ये शिकतो. कोरोना मुळे गेले आठ महिने शाळा बंद आहे. त्यानंतर शाळा सुरू करत असताना ज्या पालकांना कोरोणाबाबत भीती वाटत आहे अशा पालकांच्या मुलांचे ऑनलाइन शिक्षण शाळेने सुरू ठेवावे असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या शाळेने आमचे ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. उरलेले दोन महिने त्यांना विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून या ना त्या कारणाने फी उकळायची आहे. आठ महिन्याच्या कालावधीत बराचसा अभ्यास शिकवून पूर्ण झाला आहे. काही थोडका पोर्शन राहिला आहे. तो विद्यार्थ्यांना ऑनलाइन द्यावा अशी पालकांची मागणी आहे. असे ते म्हणाले. तसेच शाळा प्रशासनाने वेगवेगळ्या पालकांकडून वेगवेगळी फी घेतली आहे, असेही ते म्हणाले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या फीमध्ये तफावत असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा प्रशासन आम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करत आहे

अशोक पाटील हे कोल्हापूरचे आहेत. गेली तीन वर्ष त्यांचा मुलगा या शाळेमध्ये शिकतो. ते सांगतात गेल्या तीन वर्षांच्या काळात शाळेला माझ्याकडे फी साठी तगादा लावू दिला नाही. ऑनलाईन शिक्षणाची फी देखील आम्ही भरलेली आहे. मात्र सप्टेंबर पासून माझ्या मुलाच्या ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था शाळेने बंद केलेली आहे. यामुळे माझ्या मुलाचे शैक्षणिक वर्ष फुकट जाते की काय याची मला भीती वाटते आहे. माझ्या मुलाचे शैक्षणिक वर्ष फुकट घालवून शाळा प्रशासन आम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आता यापुढे काय करायचं असा प्रश्न आम्हाला पडला आहे. शाळेचे आडमुठे धोरण असेच चालू राहिले तर पुढे काय होईल हे त्यांना लवकरच बघायला मिळेल. असा इशारा देखील अशोक पाटील यांनी दिला आहे.

फी भरता येत नसेल तर तुमच्या मुलांना शाळेतून काढून घेऊन जा

दरम्यान, सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आंबोली येथे दाखल होत शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आपल्या दालनात शाळा प्रशासनाचे पदाधिकारी आणि पालक यांची संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. राजाराम म्हात्रे यांच्यासमोर आपले म्हणणे मांडताना पालकांनी शाळा प्रशासनाच्या आडमुठे धोरणावर आक्षेप नोंदवला. तुम्हाला फी भरता येत नसेल तर तुमच्या मुलांना शाळेतून काढून घेऊन जा असे वक्तव्य शाळेच्या संचालकांनी केले असल्याचे पालकांनी तहसीलदारांना सांगितले.

Last Updated : Feb 25, 2021, 10:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details