महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar Car Driven By LPC : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसाकडून सारथ्य, पाहा VIDEO - राज्यमंत्री सतेज पाटील

आपण अनेकदा नेते, मंत्र्यांच्या गाडीवर पुरुष चालक असल्याचे पाहतो. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar In Sindhudurg ) यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने ( Ajit Pawar Car Driven By LPC ) केले. त्यामुळे या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्य

By

Published : Dec 26, 2021, 9:51 PM IST

Updated : Dec 26, 2021, 10:27 PM IST

सिंधुदुर्ग - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी ( Ajit Pawar In Sindhudurg ) त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक ( LPC Trupti Mulik ) या सिंधुदुर्ग पोलिस दलातील महिला चालकाने ( Ladies Driver For Ministers Vehicle ) केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपण नेहमी मंत्री, नेत्यांच्या गाडीला पुरुष चालक असल्याचे पाहत असतो. मात्र अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य ( Ajit Pawar Car Driven By LPC ) करण्याची संधी ही महिला पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आली. या महिला पोलिसानेही सफाईदारपणे गाडी चालवत आम्ही महिला पण याबाबतीत कुठेही मागे नाही, हेच दाखवून दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसाकडून सारथ्य

महिला सक्षमीकरणाची पावतीच

आज ओरस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक ( Sindhudurg DPC Meeting ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. ते विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलीसाने केले. त्यामुळे तृप्ती मुळीक या महिला पोलीस भगिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले, ही पहिलीच घटना असावी. राज्य शासन नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणावर ( Woman Empowerment ) भर देत आहे, त्याची ही पावतीच म्हणावी लागेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महिला पोलीस कर्मचारी तृप्ती मुळीक
उपमुख्यमंत्र्यांसोबत उदय सामंत, सतेज पाटीलही होते गाडीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केले. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा लोकनेते शरद पवार यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून येते. या गाडीत पालकमंत्री उदय सामंत ( Gaurdian Minister Uday Samant ) , राज्यमंत्री सतेज पाटील ( State Minister Satej Patil ) हे देखील होते.

Last Updated : Dec 26, 2021, 10:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details