महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बफर झोनमधील बागायती आणि शेती व्यवसाय सुरू राहणार' - कणकवली कोरोना न्यूज

जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्या ठिकाणची गावे कंटेन्टमेंट झोन आणि बफर झोनमध्ये आहेत. अशा गावातील आंब्यासारख्या बागायती व्यवसायाचा प्रश्न निर्माण झाला होता.

vaishali rajmane
वैशाली राजमाने, प्रांताधिकारी, कणकवली

By

Published : May 22, 2020, 12:19 PM IST

सिंधुदुर्ग - बफर झोनमधील बागायती आणि शेती व्यवसाय सुरू राहणार आहे. तर, कंटेन्टमेंट झोनमधील आंब्यासारख्या बागायती व्यवसायाचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासन नेहमीच तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी सांगितले.

जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्या ठिकाणची गावे कंटेन्टमेंट झोन आणि बफर झोनमध्ये आहेत. अशा गावातील आंब्यासारख्या बागायती व्यवसायाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर प्रांताधिकारी यांच्या दालनात बैठक झाली. त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देत या दोन्ही झोनमधील बागायतदार आणि शेतकरी यांना नियमाच्या अधीन राहून सहकार्य करावे, अशा सूचना केल्या. बफर झोनमध्य शेती बागायती व्यवसाय सुरू राहील त्याला कोणतीही बंदी नाही, असे त्या म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details