महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात शिक्षक संघाचे आंदोलन; प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष - primary teachers association sindhudurg latest news

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाची लखनौ येथे बैठक झाली होती. या बैठकीतील निर्णयानुसार जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले.

Agitation in sindhudurg by primary teachers association
सिंधुदुर्गात शिक्षक संघाचे आंदोलन

By

Published : Dec 21, 2019, 9:59 PM IST

सिंधुदुर्ग - अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आज (शनिवारी) प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. तर मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही शिक्षक संघातर्फे देण्यात आला.

'या' आहेत शिक्षकांच्या बातम्या.

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाची लखनौ येथे बैठक झाली होती. या बैठकीतील निर्णयानुसार जूनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष प्रकाश दळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनात राज्य संयुक्त चिटणीस महादेव देसाई, जिल्हाध्यक्ष के. टी. चव्हाण, यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी 'एकाच मिशन, जूनी पेन्शन', 'कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

हेही वाचा -भारत धर्मशाळा आहे का? नागरिकत्व कायद्यावरून राज ठाकरेंचा मोदी सरकारला प्रश्न

'या' आहेत मागण्या -

  • 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करावी
  • 6 व्या वेतन आयोगातील त्रूटी दूर करून त्याचा लाभ 1 जानेवारी 2006 पासून देण्यात यावा
  • शिक्षण सेवक पद्धधत बंद करून नियमित शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी

ABOUT THE AUTHOR

...view details