सिंधुदुर्ग- जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटीक स्पोर्टसला (इसादा) अत्याधुनिक बोटी देण्यात आले आहे. या बोटींचे उद्घाटन राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ( Aditya Thackeray inaugurates modern boats ) आज करण्यात आले.
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अत्याधुनिक बोटीचे सिंधुदुर्गमध्ये उद्घाटन सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटनराज्यातील साहसी पर्यटनाला चालना देणे, स्थानिकांसाठी पर्यटनाच्या संधी निर्माण करणे आणि साहसी पर्यटन अधिक रोमांचकारी बनविणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अँक्वाटीक स्पोर्टसच्या (इसादा) माध्यमातून निवति रॉक जवळील समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताफ्यात एक अत्याधुनिक बोट दाखल होत आहे. सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्याच्या योजनेतील हा पहिला ( boost tourism in Sindhudurg ) टप्पा समजला जात आहे.
हेही वाचा-Mumbai Film City Redevelopment : मुंबई चित्रनगरीच्या विकासाकरिता रामोजी फिल्म सिटीला निमंत्रण
नीवती रॉकजवळील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता
विदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची डायव्हिंग बोट वापरली जाते. अशीच ही बोट असणार आहे. या बोटीवर स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, प्रशस्त डेक आणीं केबिन, लाईफ सपोर्ट यंत्रणा व उत्तम सीटिंग व्यवस्था असणार आहे. रात्रीच्या स्कुबा डायव्हिंग साठीही या बोटीवर आधुनिक यंत्रणा असणार आहे. मालवण येथील एमटीडीसीच्या स्कुबा डायव्हिंग सेंटरमधून पर्यटकांना नीवती रॉक जवळील समुद्रात दर्जेदार स्कुबा डायव्हिंग घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. परंतु नीवती रॉक जवळ पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक बोटीची गरज भासत होती. इसदाच्या ताफ्यात आता अत्याधुनिक बोट दाखल होत असल्याने नीवती रॉकजवळील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-Lalu Yadav Fodder Scam : 139 कोटींच्या चारा घोटाळाप्रकरणी लालूंना ५ वर्षांची शिक्षा
पाच राज्यांचा प्रवास करून बोट मालवणमध्ये दाखल-
आंध्रप्रदेश मधील पुंदुचेरी येथील शिपयार्डमधून ही बोट घेऊन डॉ. सारंग कुलकर्णी निघाले. त्यांचा एकूण १८०० किलोमीटरचा हा प्रवास आहे. पाच राज्यांमधील रामेश्वर, कन्याकुमारी, कोचीन, मंगळूर, कारवार असा प्रवास करून ही बोट मालवणमध्ये आणण्यात आली आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते.
हेही वाचा-Chandrakant Patil Statement On Sanjay Raut : 'संजय राऊत यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे'