महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात मुंबई-गोवा महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; ९ जखमी - मुंबई-गोवा महामार्ग अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर दोन ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ९ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघे गंभीर आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

accident
अपघात

By

Published : Nov 9, 2020, 12:13 PM IST

सिंधुदुर्ग - मुंबई-गोवा महामार्गावर जाणवली रतांबे व्हाल येथे सकाळी दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका ट्रकमधून जाणारे ९ कामगार जखमी झाले आहेत. यामध्ये चालकाचाही समावेश आहे. सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाणवली भागात अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सिंधुदुर्गात मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात नऊ जण जखमी झाले

या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघेजण गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तर इतरांवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .जखमींमध्ये विनायक कृष्णा चौगुले(३८), शिवाजी पाटील (२८), जयराम बामाजी लांबोरे (४१), चिरंजीव उत्तम पाटील (२६), सुशांत डोगले (२३), रंगराव कस्तुरे (३८), मिलींद पाटील (२४), सचिन बारड (२७), विवेकानंद चौगुले (२९) यांचा समावेश आहे. या अपघातानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर जखमी रुग्णांचा जाबजबाब नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उतम वंजारे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details