सिंधुदुर्ग- जिल्ह्यात गुरूवारीविधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सिंधुदुर्गमध्ये सरासरी 52.41 मतदानाची नोंद झाली होती. तर कुडाळ-मालवण मतदारसंघात फक्त 50.47 टक्केच मतदान झाले.
वैभव नाईक, उमेदवार, शिवसेना हेही वाचा - निलेश राणेंनी बजावला मतदानाचा हक्क !
ग्रामीण भागातही मतदानाची मंद गती होती. तर संध्याकाळी झालेल्या पावसामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या आशेवरही पाणी पडण्याची शक्यता आहे. मात्र, या मतदारसंघातील विद्यमान आमदार व शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी आपल्याच विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्गात मतदानाला सुरुवात; सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह
5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
- सिंधुदुर्ग - 52.41 टक्के
- कणकवली - 55.09 टक्के
- कुडाळ - 50.47 टक्के
- सावंतवाडी - 51.53 टक्के