महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Konkan Tradition : कोकणातील अनोखी गावपळण परंपरा, संपूर्ण गाव जातो गावाबाहेर वस्तीला... - culture

कोकणातील एक अनोखी आणि वेगळी (Tradition In Konkan) परंपरा म्ह्णून 'गावपळण' ( village migration tradition) ओळखली जाते. मालवण तालुक्यातील ही परंपरा देवाचा कौल घेऊन दर तीन वर्षांनी मोठ्या उत्साहात जोपासली जाते. अशीच चिंदर गावची गावपळण. संपूर्ण गाव आपली घरे दारे सोडून गावाबाहेर गेला आहे.

kokan
कोकणातली अनोखी गावपळण परंपरा, संपुर्ण गाव जातो गावाबाहेर वस्तीला...

By

Published : Nov 19, 2022, 7:51 PM IST

सिंधुदुर्ग:कोकणातील एक अनोखी आणि वेगळी (Tradition In Konkan) परंपरा म्ह्णून 'गावपळण' ( village migration tradition) ओळखली जाते. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ही परंपरा देवाचा कौल घेऊन दर तीन वर्षांनी मोठ्या उत्साहात जोपासली जाते. अशीच चिंदर गावची गावपळण. संपूर्ण गाव आपली घरे दारे सोडून गावाबाहेर गेला आहे. देवाने दिलेल्या कौलानुसार चिंदर गावातील गावपळण शुक्रवारी दुपारनंतर सुरू झाली. गावं मनुष्य व पाळीव प्राण्यांसह तीन दिवस वेशीबाहेर गेला आहे. तीन दिवसांनी देवाचा कौल घेऊन पुन्हा सर्वांचा गावात प्रवेश होणार आहे.

कोकणातली अनोखी गावपळण परंपरा, संपुर्ण गाव जातो गावाबाहेर वस्तीला...

अशी जोपासली जाते परंपरा-तीन दिवस, तीन रात्री वेशीबाहेर राहणाऱ्या चिंदर ग्रामस्थांच्या सुरक्षेचे रवळनाथ मंदिरात शिवकळेचे वाचन झाले. इशाऱ्याबरोबर ढोल वाजू लागले. घरे बंद करुन, दारावर झावळ्या बांधून घराभोवती राखेचे रिंगण घालून भरदुपारी चिंदर ग्रामस्थ उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. गेली क्रित्येक वर्षे सुरु असलेल्या एका आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी आता चिंदर गाव या विज्ञान युगातही चर्चेत आले आहे. कुणी खासगी वाहनाने, एसटी, रिक्षा, टेम्पोचा आधार घेत तर कोणी बैलगाडीतून जात होते. गुराढोरांसह कुणी धावतपळत ( village migration tradition) जात होते. अवघ्या काही मिनिटांत गजबजलेले चिंदर गाव शांत झाले होते. आता गजबजाट वाढला होता तो वेशीबाहेर.

अनोखी संस्कृती- या गावात ख्रिश्‍चन धर्मीयही मोठ्या आनंदाने वेशीबाहेर हिंदू धर्मीयांच्या सोबत राहात असल्याचे दिसून येते. आता तीन दिवस, तीन रात्री देवाच्या भरोश्‍यावरचं रानावनात आभाळाच्या छताखाली एकमेकांच्या सहवासात सहजीवनाचा आनंद घेतला जाणार आहे. या तीन दिवसांत त्रिंबक येथील पावणाई मंदिरात दुपारी दोन वाजता पाच मानकऱ्यांचा मेळा जमतो आणि आढावा घेतला जातो. तीन दिवस, तीन रात्री भजन, फुगड्या, भेंड्या असा कार्यक्रम असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details