सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील मालवणी माणूस हा जेवढा भोळाभाबडा, तेवढा परखड असल्याचे समजले जाते. सध्या जिल्ह्यातील गावागावात होळी उत्सव सुरू आहे. यानिमित्त देवाच्या मांडावर देवाचे वार्षिक साजरे होत आहे. असाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैशिष्यपूर्ण उत्सव म्हणून सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. यावर्षी या ठिकाणी देवाला घातलेल्या गाऱ्हान्यातून थेट देवालाच धमकी देण्यात आली आहे. "ह्यो कोरोना नष्ट कर नायतर तुझ्या सेवेक कोण नसतलो" असे सांगत येथील गावकऱ्याने थेट देवालाच आव्हान दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'हे महाराजा.. ह्यो कोरोना नष्ट कर, नायतर तुझ्या सेवेक कोण नसतलो..'
सिंधुदुर्गातील वैशिष्यपूर्ण उत्सव म्हणून सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. या गावात आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा पहायला मिळते. यावर्षी या ठिकाणी देवाला घातलेल्या गाऱ्हान्यातून थेट देवालाच धमकी देण्यात आली आहे. "ह्यो कोरोना नष्ट कर नायतर तुझ्या सेवेक कोण नसतलो" असे सांगत येथील गावकऱ्याने थेट देवालाच आव्हान दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वैशिष्ट्यपूर्ण सांगेली गावातील शिमगोत्सव -
सिंधुदुर्गातील वैशिष्यपूर्ण उत्सव म्हणून सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावातील शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. या गावात आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा पहायला मिळते. या गावात देव म्हणून फणसाच्या झाडाला गोलाकार आकार दिला जातो. होळीच्या पूर्वसंध्येला त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्यानंतर मध्यरात्री विधीवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापणा केली जाते. होळी म्हणून गावात ग्रामदेवतेची प्रतिष्ठापणा केली जाते. सांगेली गावचे ग्रामदैवत झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. या देवाला गिरीजानाथ किंवा गिरोबा असं संबोधलं जातं.