महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुंचल्यातून साकारली लॉकडाऊनची व्यथा, सिंधुदुर्गच्या श्रीकृष्ण सावंत यांची अनोखी कला - sindhudurg news about lockdown

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रीकृष्ण सावंत यांनी आपल्या चित्रकलेच्या छंदातून अनेक चित्रे रेखाटली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रातून कोरोनाला घाबरून न जाता त्याच्याशी दोन हात करण्याचा संदेश दिला आहे.

A person from Sindhudurg draw art on Lockdown Situation
कुंचल्यातून साकारली लॉकडाऊनची व्यथा, सिंधुदुर्गच्या श्रीकृष्ण सावंत यांची अनोखी कला

By

Published : Apr 26, 2020, 8:16 AM IST

सिंधुदुर्ग - कोरोना विषाणूमुळे सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग घेत अनेकांनी आपल्या कल्पनेतून विरंगुळा शोधला आहे. तसेच, लोकप्रबोधनही सुरु केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रीकृष्ण सावंत यांनी आपल्या चित्रकलेच्या छंदातून अनेक चित्रे रेखाटली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रातून कोरोनाला घाबरून न जाता त्याच्याशी दोन हात करण्याचा संदेश दिला आहे.

कोरोनाच्या काळात घरात बसून श्रीकृष्ण सावंत यांनी पक्षांसारख्या मुक्त असलेल्या, पाण्यात मुक्त संचार करणाऱ्या जलचरांना आणि रेल्वे स्थानकासारख्या मुक्या निर्जीव असलेल्या ठिकाणांना चित्र शैलीत त्यांनी बोलते केले आहे.

श्रीकृष्ण सावंत हे कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील रहिवीसी आहेत. त्यांनी आपल्या चित्रातून अनेक गोष्टींमधली एक व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊनमुळे सध्या मच्छिमारी बंद आहे. या पार्श्वभूमीवर सुरमई संवाद साधते, की 'लॉकडाऊन आहे तोवर जग फिरून घे, त्यानंतर आपण कुठे असू हे सांगता येणार नाही'. सध्या लॉकडाऊनमध्ये एक चित्र दिसते ते म्हणजे, लोक घरात आहेत आणि प्राणी व पक्षी मुक्त संचार करत आहेत. यावर सावंत याचे चित्र भाष्य करते, 'पक्षाला बघून घरात बंद असलेला माणूस पुढच्या जन्मात देवाकडे पक्षाचा जन्म मागतोय. त्याला पक्षासारखा मुक्त संचार करायचा आहे'. आणखी असेच एक चित्र जे धुम्रपान, दारू, डान्सबार, गुटका यांना आयुष्यातून कायमच लॉकडाऊन करायला सांगताना दिसते. अशी अनेक चित्रे जी सामाजिक व्यथा मांडतात, ती सावंत यांच्या कुंचल्यातून साकार झालेली पहायला मिळतात. सावंत यांनी टाकाऊ कपड्यांपासून विविध आकर्षक बाहुल्याही बनवल्या आहेत.

कुंचल्यातून साकारली लॉकडाऊनची व्यथा, सिंधुदुर्गच्या श्रीकृष्ण सावंत यांची अनोखी कला
कोरोनाच्या काळात घरी बसून अनेकजण कंटाळले आहेत. मात्र, त्यांनी कंटाळून जाऊन घराबाहेर पडू नये. आपण घरात राहिलात तरच ही लढाई जिंकणार आहोत. मात्र, आपल्या कलागुणांना वाव देताना सामाजिक प्रबोधन करा, त्यातून तुम्ही प्रसन्न रहाल, तुमचा वेळही जाईल आणि घरात बसूनही आपण आनंदी रहाल, असे मत श्रीकृष्ण सावंत यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details