सिंधुदुर्ग- जिल्ह्यात कोकण रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या सामान ठेवण्याच्या कोचला आग लागली आहे. या आगीत कोच जाळून खाक झाला आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव काहीवेळ कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती ती आता सुरळीत सुरु झाली आहे.
कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या कोचला आग; जीवितहानी नाही - झारप कुडाळ स्टेशन
कोकण रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशन डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील झाराप-कुडाळ रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडली.
रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या कोचला आग
कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या सामान ठेवण्याच्या कोचला आज सकाळी साडे नऊच्या सुमारास आग लागली. झाराप स्टेशन जवळ ही आग लागली. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग विझविण्यासाठी कुडाळ एम आय डी सी, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर आता नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या आगीमुळे कोकण रेल्वे वरील वाहतूक सुरक्षितते साठी काही काळ थांबवण्यात आली होती. रेल्वे वाहतूक साडे अकरा वाजता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.