सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 946 व्यक्ती अलगीकरणात आहेत. यामध्ये 632 व्यक्ती गृह अलगीकरणात तर 314 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 946 व्यक्ती क्वारंटाईन - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी - Sindhudurg corona news
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 946 व्यक्ती अलगीकरणात आहेत. यामध्ये 632 व्यक्ती गृह अलगीकरणात तर 314 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 802 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 765 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 4 अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरीत 761 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 37 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील 26 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 2 हजार 591 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 4 कोरोनाबाधीत रुग्णांपैकी 2 रुग्णांवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. तर इतर दोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.