मुंबई - राज्यात आज वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजचा वार हा जलाघात ठरला आहे. गडचिरोलीमध्ये दोन चुलत भाऊ, रायगडमध्ये दोन सख्खे भाऊ तर, मालवणमध्ये वडील आणि मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गडचिरोली -
गडचिरोलीच्या बोदली गावात विट भट्टीवरील राख आणण्यासाठी गेलेल्या २ चुलत भावांचा शेत तळ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुन्ना मनोहर मेश्राम (वय १३) आणि किसन जगदिश मेश्राम (वय १३) दोघेही राहणार बोदली अशी मृत झालेल्या भावांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त वाचा - शेततळ्याच्या पाण्यात बुडून चुलत भावांचा मृत्यू ; बोदली गावातील घटना
रायगड -
मुरूड तालुक्यातील फणसाड धरणात रोहा तालुक्यातील सारसोली गावच्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. ओंकार बिरवाडकर (वय १७) आणि गौरव बिरवाडकर (वय १३) अशी या दोन भावांची नावे आहेत. हे दोघेही उन्हाळी सुट्टीनिमित्त मांडला येथे नातेवाईकांकडे आले होते. आज सकाळी हे दोघे भाऊ, नातेवाईक आणि गावातील तरुण फणसाड धरणावर फिरण्यास व पोहण्यास गेले होते.
सविस्तर वृत्त वाचा - रायगडमध्ये फणसाड धरणात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू
सिंधुदुर्ग -
तर, मालवण तालुक्यातील श्रावण येथे उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या बाप-लेकांचा पाण्यात बुडून अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महेश वेदरे आणि मयूर वेदरे (मुलगा) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही घराजवळच असलेल्या नदीत शुक्रवारी (१७ मे) अंघोळीसाठी गेले होते.
सविस्तर वृत्त वाचा- सुट्टीत गावी आलेल्या बाप-लेकाचा नदीत बुडून मृत्यू; मालवण तालुक्यातील श्रावण येथील दुर्दैवी घटना