महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हजारो पणत्यांच्या प्रकाशात उजळले ओरोसचे रवळनाथ मंदिर

रवळनाथ मंदिरात गावच्या लोकसंख्येइतक्या म्हणजेच 5000 पणत्यांची नेत्रदीपक आरास पहायला मिळाली. गावातील नागरिक संतोष वालावलकर मित्रमंडळाने ग्रामस्थांच्या सुखी-संपन्न व निरोगी दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी ही आरास केली होती.

By

Published : Nov 14, 2019, 9:15 AM IST

ओरोस रवळनाथ मंदिरात उजळल्या गावच्या लोकसंख्येइतक्या ज्योती


सिंधुदुर्ग - त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने ओरोसचे ग्रामदैवत असलेल्या रवळनाथ मंदिरात गावच्या लोकसंख्येइतक्या म्हणजेच 5000 पणत्यांची नेत्रदीपक आरास पहायला मिळाली. गावातील नागरिक संतोष वालावलकर मित्रमंडळाने ग्रामस्थांच्या सुखी-संपन्न व निरोगी दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी ही आरास केली होती. ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने या दीपोत्सवात आपला सहभाग दर्शवला.

ओरोस रवळनाथ मंदिरात उजळल्या गावच्या लोकसंख्येइतक्या ज्योती

हेही वाचा -खोपोलीतील शिवकालीन भैरवनाथ मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव

यावेळी बोलताना, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी गावातील नागरिकांच्या या उपक्रमामागचा हेतू स्पष्ट केला. यशस्वी आयोजनाबद्दल समाधानही व्यक्त केले. तर, ओरोस ग्रामपंचायत सदस्या साक्षी कोचरेकर यांनी ग्रामस्थांप्रती चांगली कामना घेऊन नियोजनबद्ध आयोजन केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले .

ABOUT THE AUTHOR

...view details