महाराष्ट्र

maharashtra

सिंधुदुर्गात पावसाचा कहर; कुडाळमधील २७ गावांचा संपर्क तुटला

By

Published : Aug 6, 2020, 2:49 PM IST

माणगाव खोऱ्यात मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने माणगाव, साळगाव, दत्त मंदिर रोडवर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली. आंबेरी पुलावरही पाणी आल्याने २७ गावांचा संपर्क तुटला. रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे पुलाचा अलीकडील भाग पूर्णतः कोसळून वाहतूक ठप्प झाली.

heavy rains in sindhudurg district
सिंधुदुर्गात पावसाचा कहर; कुडाळमधील २७ गावांचा संपर्क तुटला

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे परिसरातील नदी नाले तुडूंब भरले असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले होते. शिरोडा बाजारपेठेत पावसाचे पाणी वाढल्याने काही दुकानांमध्ये हे पाणी घुसल्याने नुकसान झाले. तर कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावर पाणी आल्याने २७ गावांचा अजूनही संपर्क तुटलेला आहे.

सिंधुदुर्गात पावसाचा कहर; कुडाळमधील २७ गावांचा संपर्क तुटला

दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. अनेक मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने त्या त्या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. दरम्यान, शिरोडा येथील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाणी घुसल्याने दुकानचे मालक बादलीने पाणी उपसुण काढत होते. तर काही दुकानांमध्ये जास्त पाणी गेल्याने पंपाद्वारे पाणी दुकानातून बाहेर काढण्यात येत होते. पाणी वाहून जाणारे गटार अरुंद असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याने सततच्या पावसामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मातीने तुंबलेली गटारे साफ करणे व गटारांची रुंदी वाढविल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. गटारांची रुंदी वाढवण्याची मागणी व्यापारी करीत आहेत. जोराचा वारा पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा खेळखंडोबा होत आहे. तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने दोन दिवस शिरोडा परिसरात वीज नाही. सतत कोसळत असलेल्या पावसाने तालुक्यातील काही घरांचीही पडझड झालेली आहे. दोन दिवस भ्रमणध्वनी, दूरध्वनी व इंटरनेट सेवा बंद होती त्यामुळे बँक व इतर व्यवहार होऊ शकले नाहीत.

माणगाव खोऱ्यात मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने माणगाव, साळगाव, दत्त मंदिर रोडवर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली. आंबेरी पुलावरही पाणी आल्याने २७ गावांचा संपर्क तुटला. रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे पुलाचा अलीकडील भाग पूर्णतः कोसळून वाहतूक ठप्प झाली. गेल्या वर्षी याच पुलासाठी आमदार वैभव नाईक यांनी सहा कोटी रुपये मंजूर करून भूमी पूजनाचा कार्यक्रम केला होता. मात्र, माणगाव खोऱ्यातील सुमारे सत्तावीस गावांचा प्रमुख दुवा असलेला आंबेरी पूल पावसात वाहून गेल्यानंतर बांधणार काय, असा प्रश्न माणगाववासियांना पडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details