महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ उमेदवार रिंगणात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही मतदार संघात जोरदार लढत पहायला मिळणार आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी मतदार संघात एकूण २३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

नारायण राणे व नितेश राणे

By

Published : Oct 10, 2019, 6:43 AM IST

सिंधुदुर्ग -जिल्ह्यातील तिनही मतदार संघात जोरदार लढत पहायला मिळणार आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी मतदार संघात एकूण २३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर ६ लाख ७० हजार ५८३ मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ उमेदवार रिंगणात


कणकवली मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या संदेश पारकर यांनी बंडखोरी केली होती. मात्र राणेंना विरोध म्हणून शिवसेना उमेदवाराला पाठींबा देत त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. कणकवली मतदार संघातून नितेश राणे (भाजप), राजन दाभोळकर (मनसे), विजय सूर्यकांत साळकर (बसपा), सतीश सावंत (शिवसेना), सुशिल अमृतराव राणे (काँग्रेस), डॉ. मनाली वंजारे (वंचीत आघाडी) आणि वसंतराव भोसले (बहुजन मुक्ती पार्टी) असे सात उमेदवार रिंगणात आहेत.


कुडाळ मतदार संघात भाजपची बंडखोरी झाली होती. मात्र, अतुल कळसेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तसेच जिल्हा भाजपने स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला जाहीर समर्थन दिले आहे. त्यामुळे रणजीत देसाई यांच्या रूपाने स्वाभिमानने शिवसेनेला आव्हान दिले आहे. या मतदार संघातून अरविंद मोंडकर (काँग्रेस), रवींद्र कसालकर (बसपा), धीरज परब (मनसे), वैभव नाईक (शिवसेना), बाळकृष्ण जाधव (अपक्ष), रणजीत देसाई (अपक्ष) आणि सिद्धेश पाटकर (अपक्ष) असे सात उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा - https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/pune/ajit-pawar-reaction-on-uddhav-thackeray-speech-at-dasara-melava/mh20191009174324819


सावंतवाडी मतदार संघात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. असे असले तरी याठिकाणी मुख्य लढत शिवसेना विरुद्ध भाजप बंडखोर अशीच आहे. यात दीपक केसरकर (शिवसेना), प्रकाश रेडकर (मनसे), सुधाकर माणगावकर (बसपा), प्रेमानंद साळगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस), दादू उर्फ राजू कदम (बहुजन मुक्ती पार्टी), यशवंत पेडणेकर (बहुजन महा पार्टी), सत्यवान जाधव (वंचित आघाडी), राजन तेली (अपक्ष) आणि अंजिक्य गावडे (अपक्ष) अश्या एकूण ९ उमेदवारांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details