महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना अपडेट : जिल्ह्यात २ जण कोरोना पॉझिटिव्ह, ४८८ क्वारंटाईन - sindhudurg updates

जिल्ह्यात एकूण 488 व्यक्ती क्वॉरंटाईन असून त्यापैकी 323 व्यक्तींना होम क्वॉरंटाईन ठेवण्यात आले आहे. तर 165 व्यक्ती या संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाने आत्तापर्यंत एकूण 566 नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी 518 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 48 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

कोरोना अपडेट : जिल्ह्यात २ जण कोरोना पॉझिटिव्ह, ४८८ क्वारंटाईन
कोरोना अपडेट : जिल्ह्यात २ जण कोरोना पॉझिटिव्ह, ४८८ क्वारंटाईन

By

Published : May 6, 2020, 7:59 AM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात एकूण 488 व्यक्ती क्वॉरंटाईन असून त्यापैकी 323 व्यक्तींना होम क्वॉरंटाईन ठेवण्यात आले आहे. तर 165 व्यक्ती या संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयाने आत्तापर्यंत एकूण 566 नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी 518 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 48 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. क्वॉरंटाईन कक्षामध्ये आजमितीस 67 व्यक्ती दाखल आहेत. त्यापैकी 30 रुग्ण हे विशेष कोव्हीड रुग्णालयात दाखल असून 37 रुग्ण हे विशेष कोव्हीड आरोग्य केंद्रामध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत मंगळवारी दिवसभरात 4 हजार 584 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील मंगळवारची स्थिती

1)घरीच क्वॉरंटाइन करण्यात आलेले - 323

2)संस्थात्मक क्वॉरंटाईन असलेले - 165

3)पाठविण्यात आलेले एकूण नमुने -566

4)अहवाल प्राप्त झालेले नमुने -518

5)आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने -3

6)निगेटिव्ह आलेले नमुने -516

7)अहवाल प्राप्त न झालेले नमुने - 48

8)क्वॉरंटाइन कक्षात दाखल रुग्ण - 67

9)सध्यस्थितीत पॉजिटीव्ह रुग्ण - 2

10)आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती - 4584

ABOUT THE AUTHOR

...view details