सिंधुदुर्ग - कोव्हिड-१९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्याचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी मध्ये RT-PCR लॅब स्थापन करण्यासाठी 1 कोटी 7 लाख 6 हजार 920 रुपये मंजूर केले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोरोना या आजाराची तपासणी करताना अडचणी येत होत्या. या आधी या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे स्वॅब मिरज किंवा कोल्हापूर येथे पाठवले जात होते.
'कोरोना पार्श्वभूमीवर कोकणासाठी RT-PCR लॅबसाठी एक कोटी 7 लाख रुपये मंजूर'
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि आपण लॅबची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंजुरी दिली आहे. त्यांचे आपण विशेष आभार मानतो, असे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे RT-PCR लॅबची मागणी केली होती. या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांनी या लॅबला मंजुरी देऊन निधीदेखील दिला आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात ही लॅब सुरू होणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. ही लॅब मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे ज्यांनी-ज्यांनी प्रयत्न केले त्यांचेही खासदार राऊत यांनी आभार मानले आहेत.