सातारा- माण तालुक्यातील बिदाल गावात आज सकाळी जेसीबी मशीनसह मुलगा विहिरीमध्ये पडला. वैभव मुळीक असे जेबीसह विहिरीमध्ये पडलेल्या तरुणाचे नाव आहे. विहिरीमध्ये 30 फूट पाणी असल्याची माहिती पोलीस पाटील लखन बोराटे यांनी दिली आहे. पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
धक्कादायक; जेसीबीसह तरुण बुडाला विहिरीत; घटनास्थळावर बचाव कार्य सुरू - Accident In Satara District
वैभव मुळीक हा आपली जेसीबी मशीन घेऊन विनायक जगदाळे यांच्या विहिरीची पाईप लाईन करण्यासाठी आला होता. मात्र जेसीबी मशीनवरील नियंत्रण सुटल्याने ती पाण्यात पडली आहे. जेसीबीसोबत वैभवही विहिरीत पडला आहे.

विहिरीत पडलेली जेसीबी
धक्कादायक; जेसीबीसह तरुण बुडाला विहिरीत; घटनास्थळावर बचाव कार्य सुरू
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, की वैभव मुळीक हा आपली जेसीबी मशीन घेऊन विनायक जगदाळे यांच्या विहिरीची पाईप लाईन करण्यासाठी आले होते. मात्र जेसीबी मशीनवरील नियंत्रण सुटल्याने मशीन पाण्यात पडून बुडाली आहे.
वैभव मुळीक हा तरुणदेखील मशीनसोबत विहिरीमध्ये बुडाला आहे. घटनास्थळावर बचाव कार्यासाठी 2 जेसीबी 1 पोकलेन आणि एका क्रेनला आणण्यात आले आहे. विहिरीमध्ये पडलेल्या वैभवला काढण्यासाठी घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे.