महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडमध्ये गणपती विसर्जनावेळी कोयना नदीत वाहून गेला तरुण; शोध सुरू - jackwell

चेतन शिंदे हा आपल्या दोन भाऊ व दोन मित्रांसमवेत गणपती विसर्जनासाठी जाधव वस्ती येथील जॅकवेलनजीक कोयना नदी पात्रात गेला होता. गणपती विसर्जन करून माघारी येत असताना नदीपात्रात पाय घसरल्याने तो वाहून गेला.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Sep 13, 2019, 9:35 AM IST

सातारा - राज्यासह संपूर्ण देशभरात गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. मात्र, काही ठिकाणी या विसर्जन उत्सवास गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे कराडमधील आगाशिवनगर येथे देखील घरगुती गणेशाचे विसर्जन करताना कोयना नदी पात्रात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. चेतन काका शिंदे (वय 21, रा. दत्त मंदिरानजीक, आगाशिवनगर) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

आगाशिवनगर-दत्त मंदिर येथील चेतन शिंदे हा आपल्या दोन भाऊ व दोन मित्रांसमवेत गणपती विसर्जनासाठी जाधव वस्ती येथील जॅकवेलनजीक कोयना नदी पात्रात गेला होता. गणपती विसर्जन करून माघारी येत असताना नदीपात्रात पाय घसरल्याने चेतन शिंदे हा वाहून गेला. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला गती असल्याने तो वाहून गेला. घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्याचे शोध कार्य सुरू करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details