महाराष्ट्र

maharashtra

Satara Bus Accident : ट्रॅव्हल्सची कंटेनरला पाठीमागून धडक; तरूण जागीच ठार तर चौघे जखमी

By

Published : Jul 1, 2023, 7:18 PM IST

पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरवळ हद्दीत शनिवारी सकाळी आणखी एक भीषण अपघात झाला आहे. प्रवासी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्सने समोरील कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने एक तरूण जागीच ठार झाला तर चौघे जण जखमी झाले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

सातारा - पुणे-बंगळुरू महामार्गावर तसेच जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. शिरवळ हद्दीत शनिवारी सकाळी आणखी एक भीषण अपघात झाला आहे. प्रवासी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्सने समोरील कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने एक तरूण जागीच ठार झाला तर चौघे जण जखमी झाले आहेत. ही ट्रॅव्हल्स मुंबईहून शिराळ्याकडे चालली होती.

मुंबईहून शिराळ्याकडे चालली होती ट्रॅव्हल्स -शिरवळमधील ट्यूब कंपनीजवळ शनिवारी सकाळी झालेल्या ट्रॅव्हल्स आणि कंटेनरच्या अपघातात ट्रॅव्हल्समध्ये पुढे बसलेला सूरज भीमराव शेवाळे (वय 27, रा. टाळगाव, ता. कराड), या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. राजश्री अनिल मोरे (रा. कराड), शंकर आनंदा बागडे (रा. शिराळा, सांगली), अमित महादेव पवार (रा. किंद्रेवाडी, ता. शिराळा) आणि अंकुश पाटील (रा. पनुंब्रे, ता. शिराळा), हे चौघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिरवळ रेस्क्यू टीमची मदत -अपघाताची माहिती मिळताच पोलीस अंमलदार तुषार कुंभार, सुजित मेंगावडे आणि शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला केली. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली.

शिरवळ हद्दीत अपघातांचे प्रमाण वाढले -पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिरवळ परिसरात अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे शिरवळ पोलिसांवरील ताणामध्येही भर पडत आहे. पोलिसांच्या मदतीला शिरवळ रेस्क्यू टीम धावून येत असल्याने अनेक घटनांमध्ये पोलिसांना सामाजिक कार्यकर्त्यांची देखील चांगली साथ मिळते. या वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना आता वाहनधारकांचे प्रबोधन करावे लागणार आहे.

हेही वाचा -

  1. Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी महामार्ग' मृत्यूचा सापळा बनलाय का? अपघातांची मालिका थांबेना, राजकीय चिखलफेक सुरू
  2. Buldhana Bus Accident : जो अपघातात मृत्यू पावतो 'तो' देवेंद्रवासी होतो, समृद्धी महामार्ग दुर्घटनेप्रकरणी शरद पवारांचा हल्लाबोल
  3. Buldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघातस्थळाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट; जखमींची केली विचारपूस

ABOUT THE AUTHOR

...view details