महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाईन - Pruthviraj chavan visit

युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी कराडमध्ये हेल्पलाईन सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे सातार्‍यासह इतर जिल्ह्यातील रूग्णांना देखील बेड मिळण्यासाठी मदत होत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाईन
कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाईन

By

Published : May 3, 2021, 7:03 AM IST

कराड (सातारा) - कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसने राज्यभर कोविड हेल्पलाईन सेंटर सुरू केले आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी कराडमध्ये हेल्पलाईन सेंटर सुरू केले आहे. या माध्यमातून सातार्‍यासह इतर जिल्ह्यातील रुग्णांना देखील बेड मिळण्यासाठी मदत होत आहे.

प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड हेल्पलाईन सेंटरला माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी भेट दिली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, इंद्रजीत चव्हाण, अमित जाधव उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांच्या नातेवाईकांना बेड मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना मदत व्हावी म्हणून युवक काँग्रेसने सुरू केलेल्या हेल्पलाईन सेंटरमुळे रुग्णांच्या अडचणी दूर होत आहेत. या सुविधेची कोविड रुग्णांना चांगली मदत होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

राज्यभर कोविड हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, अतिरिक्त बिल कमी करणे, अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था, ऑक्सिजन मशिन उपलब्ध करून देण्याचे काम युवक काँग्रेसचे पदाधिकारी व स्वयंसेवक करत असल्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details