महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाबळेश्वरात संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात तरुणाची आत्महत्या - महाबळेश्वरमध्ये क्वारंटाईन तरुणाची आत्महत्या

महाबळेश्वरच्या एमटीडीसी येथे विलगीकरण कक्षात एका तरुणाने आत्महत्या केली. मृत तरूण मानसिक आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Suicide
महाबळेश्वरात संस्थांगत विलीगीकरण केंद्रात युवकाची आत्महत्या

By

Published : May 31, 2020, 3:35 PM IST

सातारा - महाबळेश्वरच्या एमटीडीसी विलगीकरण कक्षामध्ये शनिवारी सायंकाळी एका तरुणाने आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.

संबंधित युवक १५ दिवसांपूर्वी महाबळेश्वर तालुक्याच्या झांजवड गावात आला होता. हा युवक मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत असून त्याला दारुचे व्यसनही होते. सतत आत्महत्या करण्याची धमकी तो करत होता असेही स्थानिक व विलीगीकरण कक्षातील सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

त्याला कोरोनाची लागण झाली आहे, की नाही हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. घटनास्थळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील, पोलीस निरीक्षक बी ए कोंडुभैरी, आरोग्य अधिकारी अजय कदम व झांजवडचे ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्याचे शवविच्छेदन करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. घटनास्थळी आरोग्य विभाग आणि पोलीस बंदोबस्त दाखल आहे. दरम्यान मृताचे नाव प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details