सातारा - कराड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून एका तरुणावर ११ गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पवन सोळवंडे (२४) नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गुंडगिरीच्या वर्चस्व वादातून हा प्रकार झाल्याची माहितीसमोर आली आहे. या घटनेमुळे कराड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी संशयीत आरोपींना ताब्यात घेण्याची कार्यवाईदेखील सुरू केली आहे.
कराडमध्ये थरार; ११ गोळ्या झाडून तरुणाची हत्या - karad crime news
कराड शहरात मध्यरात्री घरात घुसून तरुणावर ११ गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. यात पवन सोळवंडे, (२४) नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गुंडगिरीच्या वर्चस्व वादातून हा प्रकार झाला असल्याचे समजत आहे. या घटनेमुळे कराड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पवनचे कराड येथील बुधवार पेठेत घर आहे. तो मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घरात झोपलेला असतानाच अचानक मोठा गोळीबार झाला. यात पवनचा मृत्यू झाला. घटनेनंतर बुधवार पेठ व मंडई परिसरात तणाव निर्माण झाला होता. बुधवार पेठ परिसरात काही ठिकाणी दगडफेकही झाली. घटनास्थळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावास पांगवले व पुढील तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी शिवराज इंगवले, समीर मुजावर व जुनेद शेख यांच्यासह अन्य दोघांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे.