सातारासातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून (drowned in water) तरूण आणि एका वृध्दाचा मुत्यू (two people died) झाल्याची घटना समोर आली आहे. पाटण तालुक्यातील अवसरी गावातील 22 वर्षाचा तरुण म्हैस धुवायला गेल्यानंतर तलावात बुडून मृत्यू (Death by drowning in lake) झाला. तर, क्षेत्र माहुली, सातारा येथील ८० वर्षांचा वृद्ध अंघोळीला गेल्यानंतर पाय घसरून कृष्णा नदीच्या पात्रात बुडाला. दत्ता रघुनाथ शिर्के (datta shirke) आणि दिनकर रामचंद्र पवार (dinkar pawar)अशी मृतांची नावे आहेत.
तरूणाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडलाअवसरी (ता.पाटण) गावातील दत्ता रघुनाथ शिर्के हा २२ वर्षांचा तरुण म्हैस धुवायला तलावात गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला. स्थानिकांनी दोन दिवस त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड रेसक्यु टीमला पाचारण करण्यात आले. या टीमच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने शोध घेत सात तासानंतर मृतदेह शोधून बाहेर काढला. सुनील भाटिया, अमित कोळी, जयवंत बिरामणे, अनिकेत वागदरे, अजित जाधव, आशिष बिरामणे, तेजस जवळ, अभिषेक भिलारे यांनी ही शोध मोहिम राबविली.