साताराYear Ender 2023:वर्ल्ड आर्चरीच्या इतिहासात साताऱ्यातील आदिती स्वामीने इतिहास रचला. सर्वांत कमी वयाची (१७ वर्षे) वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान तिने पटकावला. (Archery Gold Medal) वैयक्तिक सुवर्ण जिंकणारी ती पहिला महिला भारतीय ठरली. आदिती आणि तिचा सहकारी ओजस देवताळे यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा सर्वोच्च अर्जुन क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. (Puseswadi Riots) दि. ९ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपती भवनातील विशेष सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. आदितीच्या सुवर्ण कामगिरीसह अर्जुन पुरस्काराने सातार्याच्या शिरपेचात मानाचा रोवला गेला.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अस्तित्व:सरत्या वर्षात वन्यजीव प्रेमींसाठी सुखद घटना घडली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दाट जंगलात पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे आणि विष्ठा आढळली. जंगलातील ट्रॅप कॅमेर्यांची तपासणी केल्यानंतर वाघाचे फोटो कैद झाल्याचे निदर्शनास आले. वन्यजीव प्रेमींसह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टीने ही मोठी घटना ठरली. व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघांचे अस्तित्व आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. पट्टेरी वाघ पाचव्यांदा कॅमेर्यात कैद झाला आहे. यावरून पाच ते सात वाघांचे व्याघ्र प्रकल्पात अस्तित्व असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिका:सरत्या वर्षात कोयना धरण परिसरात भूकंपाचे सात धक्के जाणवले. भूकंपाच्या मालिकेमुळे कोयना खोरे हादरून गेले. दि. ८ जानेवारी 2023 रोजी २.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा वर्षातील पहिला भूकंप झाला. त्यानंतर १ फेब्रुवारी दि. ६ मे, दि. १६ ऑगस्ट, दि. ७ सप्टेंबर, दि. २९ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले. कोयना धरण परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र असल्यामुळे लहान-मोठ्या भूकंपाची मालिका सुरू असते. त्यातील काही भूकंप हे जावणतही नाहीत. या भूकंपामुळे कोठेही पडझड, जीवित वा वित्तहानी मात्र झाली नाही.
महाबळेश्वर, कराडमधील स्फोटात चौघांचा मृत्यू:सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आणि कराडमध्ये स्फोटाच्या दोन घटना घडल्या. त्यामध्ये भाजलेल्या चार जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. महाबळेश्वरमध्ये दुर्गादेवीच्या मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या जनरेटरचा स्फोट होऊन ८ मुलं भाजून गंभीर जखमी झाली होती. त्यातील दोन गंभीर जखमी मुलांचा दोन महिन्यांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. कराडमध्ये मुजावर कॉलनीतील एका घरात सिलेंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे स्फोट होऊन आठ जण जखमी झाले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला.