महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळी माण खटावमध्ये शेकडो परप्रांतीय कामगार अचानक आले कुठून? - सातारा कोरोना अपडेट

दुष्काळी माण खटाव तालुक्यात आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दोन्ही तालुके पिंजून काढून परप्रांतीय आणि दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना शोधून काढले. तसेच त्यांना क्वारंटाईन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, सातारा-पंढरपूर महामार्गाच्या कामावर कामगार आले कुठून? यापूर्वी ते कुठे राहत होते? याची माहिती प्रशासनाला नाही.

drought prone man khatav  दुष्काळी माण खटाव  सातारा पंढरपूर महामार्ग  महामार्ग कामासाठी शेकडो कामगार  सातारा कोरोना अपडेट  satara corona update
दुष्काळी माण खटावमध्ये शेकडो परप्रांतीय कामगार अचानक आले कुठून?

By

Published : Apr 24, 2020, 6:44 PM IST

सातारा -सध्या देशभरात कोरोना या संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु, काही बांधकामांना शासनाने परवानगी दिली आहे. त्यामध्ये सातारा-पंढरपूर महामार्गाच्या कामाला देखील परवानगी दिल्यामुळे काम चालू झाले आहे. मात्र, गेले महिनाभर काम बंद असताना याठिकाणी एक ही कामगार नव्हता. मग हे कामगार नक्की गेले कुठे होते, आणि आता अचानक कामावर आले कुठून? असे अनेक प्रश्न परिसरातील नागरिकांना पडले आहेत.

दुष्काळी माण खटावमध्ये शेकडो परप्रांतीय कामगार अचानक आले कुठून?
दुष्काळी माण खटाव तालुक्यात आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दोन्ही तालुके पिंजून काढून परप्रांतीय आणि दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना शोधून काढले. तसेच त्यांना क्वारंटाईन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, सातारा-पंढरपूर महामार्गाच्या कामावर कामगार आले कुठून? यापूर्वी ते कुठे राहत होते? याची माहिती प्रशासनाला नाही. तसेच कुठल्याही रेकॉर्डवर त्याची नोंद नाही. त्यामुळे ठेकेदार या कामगारांना कुठून घेऊन आला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदार देखील कोरेगाव येथून ये-जा करत आहे. त्यामुळे त्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

म्हसवड, निढळ, पुसेगाव, पिंगळी या गावामध्ये हे परप्रांतीय कामगार विखुरले आहेत. मात्र, ते राहतात कुठे आणि कुठून येतात याचा थांग पत्ता देखील प्रशासनला लागू दिला जात नाही आहे. जिल्हाधिकरी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भीती स्थानिक प्रशासनाला घातली जात असल्याची चर्चा देखील होत आहे. या कामावर शासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन ठेकेदार व कामगार यांच्याकडून होताना दिसत नाही. ना मास्कचा वापर, ना कोणत्याही प्रकारची स्वच्छता. यामुळे महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details