सातारा - इमारतीचे वॉटर प्रुफिंगचे काम सुरू असताना ५ व्या मजल्यावरून पडून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील फुटक्या तळ्याजवळ घडली. गणेश सुरेश ढाणे ( वय ३१) असे मृत तरुणाचे नाव असून तो पाडळी गावचा रहिवासी आहे.
साताऱ्यात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू - इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू
मृत गणेशचा रंगकामाचा व्यवसाय होता. फुटक्या तळ्याजवळ एका इमारतीच्या रंगरंगोटीचे काम घेतले होते. इमारतीच्या एका बाजूस वॉटरप्रुफिंगचे काम करण्यासाठी स्लॅबवर दोरीच्या सहाय्याने झोला बांधून तो ५ व्या मजल्यापर्यंत आला होता.
हेही वाचा -कांदा साठवणुकीचे नियम आणखी कडक; किरकोळ विक्रेत्यांकरता 'हा' नवा नियम लागू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेशचा रंगकामाचा व्यवसाय होता. फुटक्या तळ्याजवळ एका इमारतीच्या रंगरंगोटीचे काम घेतले होते. इमारतीच्या एका बाजूस वॉटरप्रुफिंगचे काम करण्यासाठी स्लॅबवर दोरीच्या सहाय्याने झोला बांधून तो ५ व्या मजल्यापर्यंत आला होता. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झोल्याचा दोर तुटल्याने तो जमिनीवर कोसळला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तातडीने क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.