महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा: जेसीबी पलटी होऊन वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार - जेसीबी दुर्घटना

मोरदरा शेतशिवारात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सुरू असणार्‍या वृक्ष लागवडीसाठी जेसीबीच्या बकेटमधून रोपं घेऊन जात असताना अशोक वसंतराव नलावडे या कामगाराचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत जेसीबी चालक मात्र बचावला आहे.

कंत्राटी कामगार जागीच ठार

By

Published : Aug 26, 2019, 11:43 PM IST

सातारा- कोरेगाव येथील मोरदरा शेतशिवारात जेसीबी पलटी होऊन अपघात झाला. यात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सुरू असणार्‍या वृक्ष लागवडीसाठी जेसीबीच्या बकेटमधून रोपं घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली. अशोक वसंतराव नलावडे (वय 55) असे मृत कामगाराचे नाव असून या दुर्घटनेत जेसीबी चालक मात्र बचावला आहे


नलवडेवाडी (बिचुकले) येथील अशोक नलावडे हे सामाजिक वनीकरण विभागात गेली काही वर्षे रोजंदारीवर काम करत होते. जेसीबीच्या बकेटमधून आणलेली रोपे मोरदरा नावाच्या शेतशिवारातील टेकडीवर घेऊन जात होते. त्यावेळी अचानक जेसीबी पलटी झाला. त्यामध्ये अशोक यांचा जेसीबीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ पिंपोडे बु. येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी धर्मवीर साळविठ्ठल व कोरेगाव उपविभागीय वन अधिकारी अशोक खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details